मुकेश अंबानींपेक्षा नातेवाईकांची कमाई जास्त, महिन्याचा पगार तब्बल….

| Updated on: Jul 20, 2019 | 5:35 PM

मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षीही त्यांच्या पगारात वाढ केली नाही. कंपनीच्या संचालक मंडळात असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांचा पगार वाढवण्यात आलाय. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी यांना मिळणाऱ्या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

मुकेश अंबानींपेक्षा नातेवाईकांची कमाई जास्त, महिन्याचा पगार तब्बल....
Follow us on

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani salary) यांच्यापेक्षा त्यांच्या नातेवाईकांचा महिन्याचा पगार जास्त आहे. मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षीही त्यांच्या पगारात वाढ केली नाही. कंपनीच्या संचालक मंडळात असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांचा पगार वाढवण्यात आलाय. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Neeta Ambani) यांना मिळणाऱ्या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी कंपनीने आर्थिक गोषवारा जारी केला, ज्यानुसार कंपनीला सात टक्क्यांचा फायदा झालाय. तर जिओच्या उत्पन्नातही (Reliance Jio profit) 44 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या पगारात 2008-09 पासून वाढ केलेली नाही. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार आजही 15 कोटी रुपये आहे. यामध्ये इतर सर्व प्रकारच्या खर्चांचा समावेश होतो. मुकेश अंबानी यांना 2018-19 या वर्षात 4.45 कोटी रुपये पगार व इतर खर्च, भत्ता 9.53 कोटी रुपये, इतर लाभ 31 लाख रुपये आणि निवृत्ती लाभ म्हणून 71 लाख रुपये मिळाले.

नातेवाईकांचा पगार जास्त

मुकेश अंबानी यांचे दोन नातेवाईक कंपनीच्या संचालकीय मंडळात पूर्णवेळ संचालक आहेत. निखील मेसवानी आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार 20.57 कोटी रुपये आहे. 2017-18 मध्ये या दोन्ही भावांना 19.99 कोटी रुपये, 2019-17 मध्ये 16.58 कोटी रुपये, 2014-15 मध्ये 12.03 कोटी रुपये पगार मिळाला होता. तर 2015-16 मध्ये निखील यांना 14.42 कोटी आणि हितल यांना 14.41 कोटी रुपये पगार मिळाला होता.

कंपनीचे कार्यकारी संचालक पी एमएस प्रसाद आणि रिफायनरीचे मुख्य अधिकारी पवन कुमार कपिल यांच्या पगारातही गेल्या वर्षीच्या तुलनेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. या दोघांचा पगार अनुक्रमे 10.01 कोटी आणि 1.17 कोटी रुपये एवढा झाला आहे.

कंपनीच्या विना कार्यकारी संचालक नीता अंबानी आणि एसबीआयच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांना मिळणारं कमीशन आणि फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. नीता अंबानी यांना कमीशन म्हणून 1.65 कोटी रुपये आणि 7 लाख रुपये सिटिंग फी म्हणून देण्यात आली. तर भट्टाचार्य यांना 75 लाख रुपये कमीशन आणि 7 लाख रुपये संचालकीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित लावल्याबद्दल देण्यात आले.