AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला दिली तब्बल ‘इतकी’ देणगी!

मुकेश अंबानी यांचा मुलगा दिवाळीच्या मुहूर्तावर साईदर्शनासाठी शिर्डीत! किती देणगी दिली माहितीये?

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला दिली तब्बल 'इतकी' देणगी!
अंबानींच्या मुलाचं शिर्डी संस्थानला दान...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Oct 24, 2022 | 4:07 PM
Share

शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीत हजेरी लावली. त्यांनी शिर्डीतील साई बाबा मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) जाऊन दर्शन घेतलं. या भेटीदरम्यान, अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला. याबाबत मंदिर समितीच्या वतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.

अनंत अंबानी यांनी साई बाबांच्या मध्यान्ह आरतीचा हजेरी लावली होती. साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबनी यांचं स्वागत केलं. अनंत अंबानी यांच्या शिर्डीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ :

दोन वेळा दौरा रद्द

या आधी ऑक्टोबर महिन्यात अनंत अंबानी यांनी शिर्डी जाण्याचा दौऱ्याचं नियोजन केलं होतं. मात्र महिन्याभरात दोन वेळा त्यांना वेगवेगळ्या कारणामुळे दौरा रद्द करावा लागला होता. अखेर त्यांनी दिवाळीचं निमित्त साधून साईनगरी जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली.

अनंत अंबानी यांनी शिर्डीज आधी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर साईंचरणी 1.51 कोटी रुपयांच्या देणगीचे धनादेश अर्पण केला. अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

शिर्डीमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साई बाबांचे अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. देशभरातील भाविक शिर्डीत दिवाळीला दर्शनासाठी येत असल्यानं मोठी गर्दीही होते.

दोन दिवसांपूर्वीच अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तब्बल 3 तास अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर चर्चा झाली होती. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती. या भेटीच्या दोन दिवसांनंतर अनंत अंबानी हे शिर्डी दौऱ्यावर गेल्याचं पाहायला मिळालंय.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन