गृहिणींचं बजेट कोलमडणार, गॅस महागला!

| Updated on: Dec 15, 2020 | 3:04 PM

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीची समिक्षा करत असतात. या महिन्यात 1 डिसेंबरलाच कमर्शियल गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान प्रत्येक राज्यातील कररचना वेगळी असल्यानं त्यानुसार टाकीच्या किमतीत फरक पडू शकतो.

गृहिणींचं बजेट कोलमडणार, गॅस महागला!
Follow us on

मुंबई: घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या टाकीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 5 किलोची छोटी टाकी 18 रुपयांनी महागली आहे. तर 19 किलोच्या मोठ्या टाकीच्या किमतीत 36.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी गॅसच्या किमतीत मोठी वाढ केल्यानं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (LPG Gas price hiked by Rs 50)

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीची समिक्षा करत असतात. या महिन्यात 1 डिसेंबरलाच कमर्शियल गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान प्रत्येक राज्यातील कररचना वेगळी असल्यानं त्यानुसार टाकीच्या किमतीत फरक पडू शकतो.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार आता दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाची विनाअनुदानित गॅसची टाकी 644 रुपयांना मिळणार आहे. मुंबईतही दिल्ली इतक्याच दराने गॅस मिळेल. कोलकाता इथं याच टाकीची किंमत 670.50 रुपये असणार आहे. तर चेन्नईमध्ये ही टाकी 660 रुपयांना मिळेल.

कमर्शियल गॅसही महागला

19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलो वजनाच्या गॅसच्या टाकीची किंमत 1296 रुपये झाली आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये कमर्शिलय गॅसच्या टाकीची किंमत 55 रुपयांनी वाढून 1244 आणि 1351 रुपये
झाली आहे. तर चेन्नईमध्ये आता ही टाकी 1410 रुपयांना मिळेल. 1 डिसेंबरला कमर्शियल गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

तेलाच्या किमतीत मात्र वाढ नाही

गॅसच्या किमतीत वाढ झाली असली तरी देशात सलग आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दस स्थिर आहेत. मंगळवारपासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही.

सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

भारतात सोने-चांदीचे भाव घसरण्याचे सत्र सुरुच आहे. दिल्ली सराफ बाजारात आज सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 371 रुपयांवर पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने याबाबत माहिती दिली. याआधी सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 48 हजार 831 रुपयांपर्यंत घसरला होता. सोनेपाठोपाठ चांदीचाही दर घसरला आहे. हा दर 629 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर 62 हजार 469 प्रती किलोवर येवून पोहोचला आहे. याआधी हा दर 63 हजार 98 रुपये प्रती किलो इतका होता

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं

LPG Gas price hiked by Rs 50