
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय कमाईचे साधन आहे. छोटी छोटी रक्कम प्रदीर्घ काळासाठी गुंतवल्यास त्याचा फायदा दिसून येतो. पण चांगला परतावा मिळवण्यासाठी केवळ एसआयपी सुरु करणे पुरेसे नाही. त्यासाठी नियोजन आणि योग्य फंड्सची निवड गरजेची आहे. म्युच्युअल फंड निवडताना योग्य काळजी घेतल्यास, समीक्षा केल्यास त्याचे फायदे पण दिसून येतात.
असा निवडा फंड
किती वर्षांसाठी करणार गुंतवणूक?
SIP रक्कम किती असावी?
याकडे दुर्लक्ष नको
जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा गुंतवणूक कराल तेव्हा 3 ते 5 वेगवेगळ्या श्रेणीचे फंड्स निवडा. त्यात एसआयपी करा. कारण असं विविधीकरण गरजेचं आहे. वेळोवेळी वर्षातून एकदा तरी तुमच्या पोर्टफोलियोची समीक्षा जरुर करा. एसआयपी गुंतवणुकीत संयम ठेवणे फार गरजेचे आहे. येथे पैसा वाढतो. पण त्यासाठी नियमीत गुंतवणूक करणे आणि प्रतिक्षा करणे गरजेचे ठरते. एसआयपीची जादू 10 वर्षांनी दिसू लागते.
गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही विविध म्युच्युअल फंडचा अभ्यास करा. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक समजून घ्या. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या. त्यानंतर तुमचा निर्णय पक्का करा. एसआयपी सुरु केल्यावर ती मध्यंतरीच बंद करू नका. नियमीत बचत हीच तुमच्या खऱ्या कमाईची किल्ली, चाबी ठरेल. हा झटपट श्रीमंतीचा मार्ग नाही हे अगोदर मनाशी पक्क करा.