
लक्झरी लाइफ जगायला कोणाला नाही आवडणार. प्रत्येकाला आलिशान कार, बंगला किंवा आलिशान फ्लॅट असावं असं स्वप्न असतं. त्यांचा पुरेपूर उपभोग घ्यायलाही नक्कीच आवडेल. जर एखादा व्यक्ती हजारो कोटींचा मालक असेल तर त्याचं आयुष्य हे कोण्या सेलिब्रिटीपेक्षा नक्कीच कमी नसेल. पण तुम्हाला माहितीये आपल्या देशात असेही व्यक्ती आहेत जे भारतीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही अगदी साधं-सरळ राहणं पसंत करतात.
भारतातील सर्वात श्रीमंत लोकलने प्रवास करते
अशीच एक व्यक्ती आहे जी भारतामधील 50 श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती, प्रचंड यशस्वी उद्योजक अन् रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधील गुरु म्हणून ओळख असलेली ही व्यक्ती चक्क मुंबईत लोकने प्रवास करते. या व्यक्तीच्या नावावर भारतातील सध्याच्या घडीला आघाडीची बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे.
रहिवाशी इमारती, डेटा सेंटर्स, इंड्रस्ट्रीज आणि लॉजिस्टीक अशा अनेक क्षेत्रांमध्ये या व्यक्तीचं नाव आहे. उद्योग समुहांची किंमत काही लाख कोटींमध्ये आहे. तर नावावर हजारो कोटींची संपत्ती आहे. असं असतानाही ही व्यक्ती अगदी साध-सरळ राहणीमान पसंत करते.
ही व्यक्ती आहे निरंजन हिरानंदानी. नाव तर तु्म्हीही ऐकलं असेलच. निरंजन हे हिरानंदानी उद्योग समुहाची सर्वेसर्वा आहे.निरंजन हे हिरानंदानी ग्रुपचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे बिझनेस लिडर आहेत. हिरनंदानी समुहाने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये निरंजन यांच्या नेतृत्वाचा आणि उद्योगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मात्र एवढ्या मोठ्या कंपनीचं नेतृत्व करणारे निरंजन यांचं रहाणीमान पसंत करतात.
18 हजार कोटींचे मालक
एका रिपोर्टनुसार, निरंजन हिरानंदानी हे भारतामधील 50 श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. निरंजन यांची 12129 कोटी 71 लाख इतकी आहे. एवढच नाही तर एकूण संपत्ती आणि इतर गोष्टींचा विचार केल्यास निरंजन हिरानंदानी हे 18 हजार कोटींचे मालक आहेत. आलिशान घरांबरोबरच निरंजन यांच्याकडे लक्झरी कार्सचा ताफा आहे. एवढे श्रीमंत असूनही मुंबईत ते चक्क लोकलने प्रवास करतात. मुंबईतील वाहतूक कोंडीमध्ये अडकून आपला मौल्यवान वेळ वाया घालवायला लागू नये म्हणून ते मुंबई लोकलने प्रवास करतात.
विशेष म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवाचा वापर करताना दिसतात. अनेकजण त्यांना चेहऱ्याने ओळखतही नसतील पण त्याबद्दल ना त्यांना कोणती नाराजी आहे ना कोणता घमंड. ते अत्यंत साधेपणाने जगतात. त्यांचे कपडेही अगदी श्रीमंत उद्योगपतींप्रमाणे नसून अगदी सर्वसामान्यांसारखे फॉर्मलमध्ये ते दिसतात. पण त्यांचे आर्थिक यश हे रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक दशकांचं समर्पण आणि कठोर परिश्रमातून मिळालेलं आहे. त्यांच्या प्रयत्नांनी केवळ मुंबईचा कायापालट केला आहे असं नाही तर शहरी राहणीमानालाही एक विशेष दर्जा प्राप्त करुन दिला आहे.
शुन्यातून उभारलं विश्व
निरंजन हिरानंदानी यांनी कष्टाने अगदी शुन्यातून त्यांचं विश्व उभं केलं आहे. निरंजन हिरानंदानी यांना सेल्फ मेड अब्जाधीश म्हणूनही ओळखलं जातं. निरंजन हिरानंदानी यांनी सीए होण्यासाठी अभ्यास केल्यानंतर आपल्या भावाबरोबर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या हिरानंदानी समुहाची स्थापना केली. वाणिज्य क्षेत्रात काही वर्षे कार्यरत राहिल्यानंतर निरंजन हिरानंदानी यांनी आपल्या भावासोबत हिरानंदानी ग्रुपची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
पुढे 1981 मध्ये हिरानंदानी यांनी कापड उद्योगात एन्ट्री केली. कालांतराने, हिरानंदानी यांनी आपले संपूर्ण लक्ष रिअल इस्टेट उद्योगाकडे वळवले आणि आज ते मुंबईसारख्या भारतातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या रिअल इस्टेट मार्केटमधील महत्त्वाचे बिल्डर म्हणून ओळखले जातात.