शाहरुखच्या ‘या’ अभिनेत्रीचा प्रीती झिंटामुळे मोडला संसार? तिच्या पतीसोबत प्रीतीचे अफेअर असल्याचा आरोप
बॉलिवूड अभिनेत्रीने तिचे लग्न तुटण्याला चक्क प्रीती झिंटाला जबाबदार मानते. तिच्या पतीसह जे की एक प्रसिद्ध दिग्दर्शकही आहेत, त्यांच्याशी प्रीतीचे अफेअर होते असा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे. दरम्यान या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात शाहरूखसोबत काम केलं. त्याची को-स्टार म्हणून काम केलं. आणि या दोघांची जोडी प्रेक्षकांनाही तेवढीच आवडली होती. कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये लग्नापेक्षाही घटस्फोट अन् कलाकारांचे विवाहबाह्यसंबंध किंवा अफेअर या गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. या बातम्यांमध्ये अनेक बड्या अभिनेता अन् अभिनेत्रींची नावे समाविष्ट आहेत. दरम्यान अशाच एका अभिनेत्रीने चक्क प्रीती झिंटावर तिच्या पतीसोबत अफेअर असल्याचे आरोप लावले होते. या अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवातच शाहरूख खानसोबत केली होती. त्यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. चित्रपट आणि त्यातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण काहीच काळानंतर ही अभिनेत्री चित्रपटांपासून दूर गेली ती कायमचीच.
शाहरुख खानची सह कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण
ही बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सुचित्रा कृष्णमूर्ती. सुचित्राने 1994 मध्ये शाहरुख खानची सह कलाकार असलेल्या ‘कभी हान कभी ना’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जी एका प्रसिद्ध निर्मात्याची पत्नीही होती. मासूम, बॅंडिट क्वीन आणि मिस्टर इंडिया सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याशी सुचित्राचे लग्न झाले होते, पण नंतर एक वेळ अशी आली की सुचित्राने शेखरसोबतच्या नात्यातील बिघाडासाठी प्रीती झिंटाला जबाबदार धरले.
प्रीती झिंटामुळे तिचे लग्न तुटले
एका मुलाखतीत सुचित्राने याबद्दलचा खुलासा केला आहे. मुलाखतीत सुचित्राने सांगितले की प्रीती झिंटामुळे तिचे लग्न तुटले. माध्यमांशी बोलताना सुचित्राने उघडपणे तिच्या भावना व्यक्त केल्या आणि तिच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी ती प्रीती झिंटाला जबाबदार धरते असेही ती म्हणाली.सुचित्राने एकदाच नाही तर अनेकदा प्रीतीवर असे आरोप केले होते.
View this post on Instagram
आरोपांवर प्रीतीची प्रतिक्रिया
प्रीतीला जेव्हा तिच्यावरील आरोपांबद्दल समजले होते तेव्हा तिने सुचित्रावर संताप व्यक्त केला होता. प्रीती म्हणाली होती की, “मी नंबर वन अभिनेत्री आहे, आणि तुझ्याकडे तर काम पण नाही. तू घर सांभाळतेस. सुचित्रा, माझ्याशी असे बोलू नकोस. तुझे मन योग्य ठिकाणी नसल्याने तुला मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्याची गरज आहे.” असं बोलून प्रीतीने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
सुचित्रा शेवटची 2022 मध्ये आलेल्या या चित्रपटात दिसली होती
दरम्यान प्रीतीच्या विधानाबद्दल सुचित्रा म्हणाली होती की, “हे जग मुक्त आहे आणि ती जे काही बोलायचं आहे ते ती बोलू शकते. घराची काळजी घेण्यात मला आनंदच आहे.” पण आजही तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या समस्यांबद्दल ती प्रीतीलाच जबाबदार धरते. सुचित्रा शेवटची 2022 मध्ये ‘ऑड कपल’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने कोणताही चित्रपट केलेला नाही.सुचित्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि पौराणिक कथांशी संबंधित अनेक तथ्ये तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
