AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने दरात मोठी घसरण, आता ट्रेंड बदलणार का? नव्या अहवालाने खळबळ

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरातील तीव्र घसरणीनंतर संपूर्ण ट्रेंड बदलेल का? एका नवीन अहवालामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत झालेल्या तीव्र घसरणीमुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या मनातअनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोन्याच्या तेजीचा कल कायम राहिल की बाजारात अजून मोठी घसरण होणार आहे? याची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे.

| Updated on: Jan 31, 2026 | 11:15 PM
Share
सोन्याच्या दरात अचानक घसरणीने भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेतील ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्या आहेत. लग्नाच्या हंगामासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांपर्यंत सर्वजण कोड्यात सापडले आहेत. MCX वर एप्रिल २०२६ च्या डिलिव्हरीमध्ये सोन्याचा भाव १८ टक्क्यांनी घसरला. सोन्याची किंमत ३३,११२ रुपयांनी घसरून १,५०,८४९ रुपयांवर बंद झाली.

1 / 8
दुसरीकडे, फेब्रुवारीतील वायदा १२ टक्क्यांनी किंवा २०,३२८ रुपयांनी घसरून १,४९,०७५ रुपयांवर आला आहे. दरम्यान, अमेरिकन गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गनच्या एका नवीन अहवालामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. बँकेचे म्हणणे आहे की २०२६ च्या अखेरीस सोन्याची किंमत (गोल्ड फोरकास्ट) ८,००० ते ८,५०० डॉलर्स प्रति औंस (अंदाजे ७.७९ लाख रुपये) पर्यंत पोहोचू शकते. एका औंसच्या किंमतीचे १० ग्रॅम सोन्यात रूपांतर केले तर ती २,३५,८०७ रुपये प्रति १० ग्रॅम होईल. ही सध्याच्या दराच्या पातळीपेक्षा एक ऐतिहासिक उसळी ठरणार आहे.

2 / 8
 भारतीय वायदा बाजार MCX वर एप्रिल २०२६ च्या डिलिव्हरीसाठी सोन्यावर अलीकडेच प्रचंड दबाव आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्यामुळे किमतींमध्ये दुहेरी अंकी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे दागिने बाजारातील खरेदीदारांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. अनेक खरेदीदार सध्या सोने खरेदीबाबत 'थांबा आणि वाट पहा' धोरण स्वीकारत आहेत, तर काही गुंतवणूकदार या घसरणीला सुवर्णसंधी मानत आहेत, परंतू जागतिक स्तरावर चित्र  वेगळे दिसत आहे.

3 / 8
 सोने आता केवळ "(Crises Hedge) " राहिलेले नाही तर ते गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एक प्रमुख मालमत्ता बनत चालले आहे असे अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी म्हटले आहे.

4 / 8
अहवालानुसार, खाजगी गुंतवणूकदार सध्या त्यांच्या पोर्टफोलिओच्या सरासरी ३% सोन्यासाठी राखीव ठेवतात.जर हा वाटा ४.६% पर्यंत वाढला, तर सोन्याच्या मागणीत वाढ  होईल, मर्यादित खाण पुरवठा आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत खरेदी यामुळे किंमती $ ८,०००-८,५०० पर्यंत वाढू शकतात.

5 / 8
अहवालात असेही म्हटले आहे की अनेक घरे आणि गुंतवणूकदार आता दीर्घकालीन रोख्यांपासून दूर जाऊन सोन्याकडे वळत आहेत. सोने ही एक अशी मालमत्ता आहे जी कोणत्याही सरकारची किंवा संस्थेची जबाबदारी नाही. म्हणूनच लोक अस्थिर आर्थिक वातावरणात सोने खरेदीला सुरक्षित गुंतवणूक मानतात.

6 / 8
जर शेअर बाजाराची तुलना सोन्याच्या बाबतीत केली तर चित्र खूपच निराशाजनक दिसते. अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ म्हणतात की महागाईमुळे शेअरच्या किंमतीत झालेल्या माफक वाढीला  कोणीही भुलू नये, खरी ताकद सोन्यात दिसून येत आहे. त्यांच्या मते, हा काळ शेअर बाजारासाठी ऐतिहासिक मंदीसारखा असू शकतो.

7 / 8
जेपी मॉर्गनच्या अहवालातील एक रंजक भाग असा आहे की किरकोळ गुंतवणूकदार 'मॅक्रो हेज' (आर्थिक जोखमींपासून संरक्षण) म्हणून बिटकॉइनपेक्षा सोन्यावर अधिक विश्वास दाखवत आहेत. सोन्यात गुंतवणुकीचा प्रवाह स्थिर दिसत आहे, तर क्रिप्टो अजूनही अधिक अस्थिर आणि अल्पकालीन व्यापाराचे साधन आहे.

8 / 8
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.