Gold Buying : 10-20 ग्रॅम नाही, 25 टन सोन्याची खरेदी, कोणी केली इतकी मोठी गुंतवणूक

Gold Investment : सोन्याने गेल्या दोन वर्षात वेगाने मोठा पल्ला गाठला आहे. सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता त्यात घसरण झाली आहे. सोने लाखांच्या जवळपास आहे. जगातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे.

Gold Buying : 10-20 ग्रॅम नाही, 25 टन सोन्याची खरेदी, कोणी केली इतकी मोठी गुंतवणूक
सोन्याचा साठा वाढला
Image Credit source: गुगल
| Updated on: May 06, 2025 | 2:19 PM

Gold Buying : गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत जबरदस्त तेजी दिसून आली. सोन्याच्या किंमतींनी एक लाखांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम लवकरच मोडीत निघण्याची शक्यता आहे. आजही सोन्याचा भाव 97 हजारांपेक्षा अधिक आहे. सोन्याच्या किंमती हाताबाहेर गेल्याने अनेक जण सोन्याची खरेदी करण्यास धजत नाहीत. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी घसरण दिसून आली. अर्थात या सोने दरवाढीचा परिणाम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या खरेदीवर झाला नाही. RBI ने एका वर्षात रेकॉर्डब्रेक 25 टन सोन्याची खरेदी केली आहे.

RBI च्या तिजोरीत 879.59 टन सोने

RBI ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसर्‍या सहामाहीत तिजोरीमध्ये जवळपास 25 टन सोने वाढले आहे. सोमवारी सरकारने याविषयीची आकडी जाहीर केली आहे. केंद्रीय बँकेकडे आजच्या घडीला 879.59 टन सोने आहे. तर सप्टेंबर 2024 च्या अखेरीस देशाकडे 854.73 टन सोने होते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केंद्रीय बँकेने सोने भांडारात 57 टनाची भर घातली. सध्या सोन्याच्या किंमतीत जवळपास 30 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या सात वर्षांमधील ही सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे.

गेल्या सात वर्षांतील ही सर्वात मोठी वार्षिक वृद्धी आहे. परकीय चलन साठ्याच्या व्यवस्थापनावरील मध्यवर्ती बँकेच्या अर्ध वार्षिक अहवालानुसार, स्थानिक पातळवर सोन्याचा साठा वाढून 511.99 टन झाला. याशिवाय देशातंर्गत सोन्या व्यतिरिक्त
348.62 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे आहे. तर 18.98 टन सोने जमा आहे.

परदेशातून भारतात आणले सोने

आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँकेने परदेशी बँकांमधून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणले. स्थानिक तिजोरीत सोन्याची एकूण प्रमाण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 510.46 टन होते. 31 मार्च, 2024 रोजी हे प्रमाण 408 टनाहून अधिक होते. भू राजकीय तणावावेळी 1991 नंतर सर्वात जास्त सोने देशात आणण्यात आले. या ताज्या अहवालानुसार, एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा सहा महिन्याअगोदर 9.32 टक्के वाढला. मार्च 2025 च्या अखेरपर्यंत 11.70 टक्क्यांपर्यंत तो वाढला. सोन्याच्या साठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.