LIC च्या या पॉलिसीत एकदा गुंतवणूक केल्यास 23 हजार रुपयांपर्यंत पेंशन, वाचा योजनेचे फायदे

| Updated on: Jun 21, 2021 | 2:08 AM

तुम्हालाही निवृत्तीवेतन मिळवून देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाटी चांगली संधी आहे.

LIC च्या या पॉलिसीत एकदा गुंतवणूक केल्यास 23 हजार रुपयांपर्यंत पेंशन, वाचा योजनेचे फायदे
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
Follow us on

मुंबई : लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (LIC) अनेक योजना चालवल्या जातात. अनेक लोक सुरक्षित पर्याय आणि नफ्याची हमी असल्यानं यात निश्चिंत होऊन गुंतवणूक करतात. या योजनांपैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे निवृत्तीवेतन देणारी पॉलिसी. तुम्हालाही निवृत्तीवेतन मिळवून देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाटी चांगली संधी आहे. या योजनेचं नाव आहे ‘जीवन अक्षय’ पॉलिसी. ही पॉलिसी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात फक्त एकदा गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेंशन मिळेल (One of the best LIC policy scheme for pension of 23 thousand per month).

जीवन अक्षय योजनेत गुंतवणुकीसाठीचे वेगवेगळे पर्याय आहेत. यामध्ये जवळपास 10 योजना आहेत. यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे जीवन अक्षय योजना प्लॅन ‘A’. हा प्लॅन ए म्हणजे ‘Annuity payable for life at a uniform rate’ (प्रति महिना पेंशन). हा एक एन्यूटी प्लॅन आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते. यात पॉलिसीधारकाला गुंतवणुकीनंतर एक निश्चित रक्कम पेंशन म्हणून मिळण्यास सुरुवात होते.

या योजनेत कोण गुंतवणूक करु शकतं?

जीवन अक्षय एक सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी प्लॅन आहे. यामध्ये लाँग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळतो. सोबतच यात जोखीम देखील कमी आहे. या योजनेत कमीत कमी 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. या पॉलिसीत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसीत 35 ते 85 वर्षाची कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करु शकते. पेंशनची रक्कम मिळवण्यासाठी एलआयसीने वेगवेगळे 10 पर्याय दिले आहेत.

23 हजार रुपये पेंशन कशी मिळणार?

महिन्याला 23 हजार रुपयांची पेंशन मिळवण्यासाठी या योजनेत एकरकमी मोठी रक्कम गुंतवावी लागते. ही रक्कम आहे 40,72,000 रुपये. इतके पैसे या पॉलिसीत गुंतवल्यास संबंधित व्यक्तीला दर महिन्याला 23 हजार रुपये पेंशन मिळते. उदाहरणार्थ, 54 वर्षाच्या व्यक्तीने सम अश्युर्ड 40,00,000 ची पॉलिसी घेतली. असा स्थितीत या व्यक्तीला वार्षिक पेंशन 2,87,200, सहामाई 1,41,000, तिमाही 69,750 आणि प्रति महिना 23,100 रुपये मिळतील. ही पेंशन आयुष्यभर मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर ही पेंशन सुविधा बंद होते.

हेही वाचा :

विमा खातं उघडून विसरलाय? LIC कडे तुमचे काही पैसे पडून तर नाही ना हे ‘असं’ तपासा

LIC ची भन्नाट योजना, 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि 17 लाख रुपये मिळवा

LIC मध्ये करा 1 लाखाची गुंतवणूक, एकत्र 20 लाख परत मिळण्याची गॅरंटी

व्हिडीओ पाहा :

One of the best LIC policy scheme for pension of 23 thousand per month