जग फिरून पुन्हा तिथच!, राख, शेणाची आता पॅकींगमध्ये विक्री, गावगाड्याला पैसा कमावण्याची संधी?

| Updated on: Feb 04, 2021 | 2:41 PM

लॉकडाउननंतर ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगानं वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरुन ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते.

जग फिरून पुन्हा तिथच!, राख, शेणाची आता पॅकींगमध्ये विक्री, गावगाड्याला पैसा कमावण्याची संधी?
Follow us on

मुंबई : लॉकडाउननंतर ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगानं वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरुन ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक प्रकारचे पर्याय आणि ऑफर देखील आपल्याला मिळतात. मात्र, आता काही वेबसाइटवर अशा काही वस्तू मिळत आहेत ज्या वस्तू कधी विकल्या जातील याचा विचार आपण स्वप्नात देखील केला नसेल आणि त्याची किंमत बघून तर तुमचे डोळे फिरतील. मात्र, यामुळे आता ग्रामीन भागातील लोकांना पैसा कमावण्याची हिच एक संधी मिळाली आहे. (Online shopping now also sells items from rural areas)

राख
ग्रामीन भागात आपण कोणाला सांगितले की, राखी विकली जाते हे ऐकल्यानंतर तेथील लोक आपल्याला वेढ्यात काढतील मात्र, हे खरे आहे ऑनलाइनमध्ये राख देखील विकली जाते आहे. आणि या राखेची किंमत देखील खूप जास्त आहे 500 रुपये प्रति किलोपर्यंत ही राख मिळते. ग्रामीन भागात ही राख कचर्‍यामध्ये फेकली जाते. काही वर्षांपूर्वी ग्रामीन भागातील लोक या राखेने दात घासत होते. तर पूर्वीच्या लोक भांडी घासण्यासाठी राख वापरत होते. आता ही काही ठिकाणी राखेने भांडे घासली जातात. मात्र, ऑनलाइन पध्दतीने राख विकली जाते ही ग्रामीन भागातील लोकांसाठी आर्श्चयाची बाब आहे.

शेणाच्या गवऱ्या
ग्रामीन भागात गायीच्या आणि मशीच्या शेणापासून गवऱ्या तयार केल्या जातात. प्रामुख्याने चुलीला घालण्यासाठी या गवऱ्या तयार केल्या जातात या गवऱ्याची ग्रामीन भागात काहीच किंमत नाही प्रत्येकाच्या घरी तुम्हाला दिसतील. परंतु आता या गवऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जात आहेत. आणि नुसत्या विकल्याच जात नाहीतर त्याची किंमतही दाबून घेतली जाते हे विशेष आहे. 150 रुपयांपर्यंत या विकल्या जातात देतात.

गोमूत्र
गावाकडे गाईचे गोमूत्र मोठ्या प्रमाणात असते मात्र, तेथील गोमूत्र वाया जाते त्या गोमूत्राचा कोणाही उपयोग घेत नाही. मात्र, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गाईचे गोमूत्र देखील विकले जात आहे. 500 मि.ली. गौमूत्राची किंमत 260 आहे. आणि विशेष म्हणजे अनेक लोक याची खरेदी देखील करत आहेत.

मुलतानी माती
आता मुलतानी मिट्टीपासून ते शेतातली काळी माती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकली जात आहे. खास गोष्ट म्हणजे लोकही ते अत्यंत उत्सुकतेने विकत घेत आहेत. 500 ग्रॅम मातीची किंमत सुमारे 100 रुपये आहे आणि लोक ते विकत घेत आहेत.

संबंधित बातम्या : 

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल

(Online shopping now also sells items from rural areas)