
मुंबईच्या एका कोर्टाने माजी सेबी प्रमुख माधवी पुरी आणि अन्य ५ लोकांवर शेअर बाजारात कथित घोटाळा केल्याच्या प्रकरणात आणि नियामक उल्लंघनच्या आरोपांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. माधवी पुरी बुच यांचा सेबी प्रमुख म्हणून कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपला आहे आणि त्यांच्या जागी ओदीशाच कॅडरचे आयएएस तुहिन कांत पांडे यांना नवीन सेबी प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे.
अमेरिकन रिसर्च फर्म डिंडनबर्गने साल २०२४ च्या अखेर तत्कालीन सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या विरोधात एक रिपोर्ट जारी केला होता, यात रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपच्या विदेशी फंडात सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची हिस्सेदारी होती. तसेच या अहवालात अदानी ग्रुप आणि सेबीच्या दरम्यान साटेलोटे असल्याचा आरोप केला होता.
हिंडनबर्गच्या या आरोपांनंतर माधवी पुरी बुच आणि त्यांचे पतीने प्रतिक्रीया देतान सांगितले की हे सर्व आरोप निराधार आहेत. त्याच बरोबर माधवी बुच यांनी आम्ही कोणतीही माहीती लपविली नसल्याचे सांगत आरोपात काहीही तथ्य नसल्याचे देखील म्हटले होते.
हिंडनबर्गद्वारा तत्कालिन सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि अदानी ग्रुपच्या दरम्यान साटेलोटे असल्याच्या आरोपांवर अदानी ग्रुपने प्रतिक्रीया देतना आरोपांना निराधार असल्याचे म्हटले होते. आम्हाला बदनाम करण्याचा आणि नफा कमावण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले होते.
माधवी पुरी बुच यांच्यावर केवळ शेअरबाजारातील घोटाळ्याचाच आरोप नाही. तर सप्टेंबर २०२४ मध्ये अर्थ मंत्रालयाला सेबीच्या ५०० कर्मचाऱ्यांनी एक पत्र लिहीले होते. ज्यात सेबी कार्यालयातील वातावरण खूपच टॉक्सिस आहे. माधवी पुरी बूच संपूर्ण मीठींग मध्ये किंचाळतात आणि ओरडतात. तसेच सेबी प्रमुख जाहीररित्या अपमान देखील करतात असा आरोप देखील कर्मचाऱ्यांनी केला आहे.