स्कॉर्पियो आणि स्वत:चं घर, पाणीपुरी विक्रेत्याची महिन्याची कमाई ऐकून IIT ग्रॅज्युएट्सची उडाली झोप

फक्त 6 तास काम करून पाणीपुरीवाला महिन्याला किती कमावतो? IIT ग्रॅज्युएट्सने पाणीपुरी विक्रेत्याला विचारताच त्यांची देखील उडाली झोप. महिन्याला किती कमाई?

स्कॉर्पियो आणि स्वत:चं घर, पाणीपुरी विक्रेत्याची महिन्याची कमाई ऐकून IIT ग्रॅज्युएट्सची उडाली झोप
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 6:57 PM

आजच्या काळात चांगली कमाई करण्यासाठी मोठी पदवी आणि कॉर्पोरेट नोकरी आवश्यक असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, एखादा छोटा व्यवसायही लाखोंची कमाई करून देऊ शकतो, याचे उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमधून समोर आले आहे. एका पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून चक्क चार IIT ग्रॅज्युएट्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे, हा विक्रेता दिवसातून केवळ सहा तास स्टॉल चालवून महिन्याला सुमारे 1.2 लाख रुपये निव्वळ नफा कमावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

IIT गुवाहाटीमधून शिक्षण घेतलेल्या वैष्णवी श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत IIT दिल्ली, IIT कानपूर आणि IIT हैदराबादमधील पदवीधरही दिसत आहेत. हे सर्वजण पाणीपुरी खाण्यासाठी एका स्टॉलवर गेले होते. त्यावेळी विक्रेत्याशी झालेल्या संवादातून त्याच्या व्यवसायाची आणि कमाईची माहिती समोर आली.

Loading...

विक्रेत्याच्या माहितीनुसार, तो दररोज संध्याकाळी 4 वाजता स्टॉल सुरू करतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत व्यवसाय करतो. म्हणजेच दिवसातील फक्त सहा तास काम करून तो महिन्याला जवळपास 1.2 लाख रुपयांचा नफा कमावतो. विशेष म्हणजे, रविवारी दुकान सुरू ठेवायचे की बंद, याचा निर्णयही तो स्वतः घेतो.

चार स्टॉलमधून महिन्याला 4.5 लाखांहून अधिक कमाई

या संभाषणादरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. पाणीपुरी विक्रेत्याकडे केवळ एकच स्टॉल नसून असे एकूण चार स्टॉल आहेत. या चारही स्टॉलमधून मिळून त्याचा मासिक नफा 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.

स्वतःचे घर आणि स्कॉर्पिओ कारही

या पाणीपुरी विक्रेत्याची आर्थिक परिस्थिती ऐकून IIT ग्रॅज्युएट्स आणखी आश्चर्यचकित झाले. वैष्णवी यांनी व्हिडीओच्या दुसऱ्या भागात सांगितले की, या विक्रेत्याचे स्वतःचे घर आहे. तो भाड्याच्या घरात राहत नाही. याशिवाय त्याच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ ही SUV कारदेखील आहे.

मोठी पदवी किंवा मोठ्या कंपनीतील नोकरीच यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग नाही, हे या उदाहरणातून दिसून येते. योग्य नियोजन, मेहनत आणि व्यवसायातील सातत्य असेल तर छोट्या व्यवसायातूनही चांगले आर्थिक यश मिळवता येऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us