AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: ‘त्या’ व्हायरल क्लीपचा सोर्स कोण? जरांगेंनी शिंदेंच्या खास शिलेदारांचं नाव घेतलं

"माझ्या विरोधात बोलण्यासाठी 30 -35 जणांची टोळी तयार केली आहे. त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. एकनाथ शिंदे हे करत आहेत. आतापर्यंत फडणवीस करत होते मात्र आता एकनाथ शिंदे ही करत आहेत. असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Manoj Jarange Patil: 'त्या' व्हायरल क्लीपचा सोर्स कोण? जरांगेंनी शिंदेंच्या खास शिलेदारांचं नाव घेतलं
| Edited By: | Updated on: Nov 06, 2026 | 7:05 PM
Share

Manoj Jarange Patil:  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडियो क्लीपने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेली ही ऑडियो क्लीप नेमकी कोणी दिली? कशी समोर आली? याबाबत गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा होताना दिसत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी याबाबतच सर्वात मोठा अन् महत्त्वाचा खुलासा केला आहे.

काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील? 

“व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमधून मराठ्यांबद्दल किती द्वे्ष आहे हे समोर आले, त्यांचा डाव हाणून पाडला. या ऑडियो क्लीपचे सोर्स सांगता येणार नाहीत. माझ्या ऐवजी रामदास कदम यांच्याकडून त्याचा सोर्स घ्यावा. मूळ डिव्हाईस त्यांच्याकडेच आहे. त्यांना याबाबत माहिती आहे.यामध्ये गरिबाचे लोक असते तर अगोदर अटक करुन मग चौकशी केली असती. मात्र आता एसआयटी अगोदर नेमली आहे. अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, रामदास कदम यांच्याकडे मूळ डिव्हाईस आहे, त्यासाठी शोधायची गरज काय? माझ्याआधी दोन तास आधी त्यांनी ती क्लीप वाजवली” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले.

तसेच “माझ्या विरोधात बोलण्यासाठी 30 -35 जणांची टोळी तयार केली आहे. त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. एकनाथ शिंदे हे करत आहेत. आतापर्यंत फडणवीस करत होते मात्र आता एकनाथ शिंदे ही करत आहेत. मी एवढ्या दिवसात हे सगळं काढलं वर्ष-सहा महिने जर मोकळा राहिलो तर सगळं काढेल मुळासकट. माझ्या लोकांमध्ये त्यांची लोकं त्यांनी घातले आहेत.आता कोणालाच नाराज करत नाही कोणावर तीन महिने बोलणार नाही,” असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये? 

दरम्यान,  यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. – 10- 20 वर्षातुन पहिल्यांदाच दिवाळीसाठी घरी आलो आहे.  पाण्याची परिस्थिती भीषण आहे, सर्वत्र फळबागा देखील जळून गेल्या आहेत.  दिवाळीच्या खूप शुभेच्छा पण यावेळी आनंद कोणाच्याच चेहऱ्यावर नाही, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कुणीही हट्ट केला नाही पाहिजे, साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली पाहिजे. हे संकटं पिढ्यानपार पाहिले आहेत कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असं ते म्हणालेत.

Follow Us
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव