
Salasar Techno Engineering : स्मॉलकॅप कंपनी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी तुफान तेजी दिसली. कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रॅली दिसली. तर आज गुरुवारी, हा शेअर 10.3 टक्क्यांनी वधारून 10.07 रुपयांवर पोहचला. अनेक गुंतवणूकदारांच्या हा शेअर खरेदीसाठी उड्या पडल्या आहेत. पण अचानक या शेअरमध्ये इतकी रॅली का आली याची चर्चा होत आहे.
3 दिवसांत 16 टक्क्यांहून अधिकची वाढ
सालासर टेक्नो इंजिनिअरिंगच्या शेअरने व्यापारी सत्रांमध्ये एकूण 16 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. बाजारात या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे दिसून आले. कंपनीचा ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ दिसली. आता जवळपास 2 कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात सरासरी व्हॉल्यूम 1 कोटी शेअर इतकी होती. त्यामुळे गुंतवणूकदारांचा या शेअरकडे ओढा असल्याचे दिसते.
प्रमोटर्सला 2.11 कोटी शेअर्सचे वाटप
कंपनीने त्यांच्या दोन प्रमोटर्सला 2.11 कोटींच्या इक्विटी शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. व्यवस्थापकीय मंडळाच्या वित्त समितीने 2,11,80,000 इक्विटी शेअर जाहीर करण्यास मंजुरी दिली आहे. प्रमोटर्स शशांक अग्रवाल आणि शलभ अग्रवाल यांनी 14.40 रुपये प्रति शेअर प्रमाणे हे शेअर देण्यात येतील. त्यातून 22.87 कोटी रुपयांची रक्कम मिळाली.
गेल्या पाच दिवसात हा शेअर 9.88 टक्क्यांनी वधारला. तर एका महिन्यात 1.57 टक्क्यांची, 6 महिन्यात 0.31 टक्क्यांची वाढ दिसली. पण एका वर्षात या शेअरमध्ये मोठी पडझड झाल्याचे समोर आले आहे. हा शेअर 49.08 टक्क्यांनी आपटल्याचे दिसते. पाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 374.51 टक्के इतका परतावा दिला आहे. तर दुसरीकडे Spice Lounge Food Works कंपनीच्या शेअरचा भाव केवळ 6 महिन्यात 263 टक्क्यांपर्यंत वधारला. त्यामुळे ज्यांनी शेअरची विक्री केली नाही. त्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला. 2025 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव 309 टक्क्यांनी वधारला. तर 1 वर्षात या स्टॉकने 710 टक्क्यांचा रिटर्न दिला. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यांची चांदी झाली.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.