Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol And Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बदल झालेला नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:46 AM, 10 Jan 2021
Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Hike

नवी दिल्ली: देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दर सध्या स्थिरावले असल्याचं दिसून येते. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) दरांमध्ये बदल केलेला नाही. यापूर्वी 29 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर बदलले होते. बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढती किंमत चिंतेचा विषय झाला होता.(Petrol And Diesel Price Today)

मुंबईतील दर

मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेले पाहायलमा मिळाले. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 90.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 81.07 रुपये प्रति लीटर इतके आहेत.

नवी दिल्लीतील दर

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मुंबईच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमंती कमी असतात. नवी दिल्लीत पेट्रोल 84.20 रुपये प्रति लीटर तर डिझेल74.38 रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये बदल झालेला नाही. तिथे पेट्रोल 86.96 तर डिझेल 79.72 रुपये प्रति लीटर 86.96 तर डिझेल 79.72 रुपयांना विकले जात आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 87.04 रुपये तर डिझेलचा दर 78.87 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली नसल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. कोलकातामध्ये पेट्रोल 85.68 रुपये तर डिझेल 79.72 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. (Petrol And Diesel Price Today)

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. (How to check diesel petrol price daily) यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल. तर भारत पेट्रोलियम (BPCL) चे दर जाणून घेण्यासाठी 8223112222 या क्रमांकावर RSP हा मेसेज पाठवावा लागेल. HPCL ग्राहकांना HPPrice हा मेसेज लिहून 9222201122 या क्रमांकाला मेसेज करावा लागेल.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

(Petrol And Diesel Price Today)