
LPG and Petrol Price : पश्चिम आशियातील युद्ध, तेथील संघर्ष यामुळे वाढलेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर होताना आहे. भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे ६० टक्के आणि एलएनजीच्या अर्ध्याहून अधिक गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्याचा एक महत्त्वाचा भाग आखाती देशांमधून येतो. परिणामी, देशभरातील काही शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची टंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी काळाबाजार झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. अनेक शहरात, तसेच गावात लोकांना सिलेंडरसाठी तासनतास रंगा लावून उभं रहाव लागत आहे, तर काही ठिकाणी गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल, छोटे-मोठे व्यवसाय यावरही परिणा होत आहे. मात्र असं असलं तरी सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. आज, सोमवार, 16 देशांतील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे लेटेस्ट दर किती, त्यावर एक नजर टाकूया.
प्रमुख शहरांत एलपीजीचे दर (16 मार्च)
| शहर | एलपीजी किंमत (रुपये प्रति सिलेंडर) |
|---|---|
| नवी दिल्ली | 913.00 रुपये |
| चेन्नई | 928.50 रुपये |
| कलकत्ता | 939.00 रुपये |
| मुंबई | 912.50 रुपये |
इतर मोठ्या शहरांत दर (16 मार्च)
| शहर | एलपीजी किंमत (रुपये/सिलेंडर) | बदल |
|---|---|---|
| नवी दिल्ली | 913.00 रुपये | 0.00 |
| मुंबई | 912.50 रुपये | 0.00 |
| कलकत्ता | 939.00 रुपये | 0.00 |
| चेन्नई | 928.50 रुपये | 0.00 |
| बंगळुरू | 915.50 रुपये | 0.00 |
| हैदराबाद | 965.00 रुपये | 0.00 |
| जयपुर | 916.50 रुपये | 0.00 |
| लखनऊ | 950.50 रुपये | 0.00 |
| पाटणा | 1002.50 रुपये | 0.00 |
| चंडीगढ़ | 862.50 रुपये | 0.00 |
| गुरुग्राम | 921.50 रुपये | 0.00 |
| नॉएडा | 910.50 रुपये | 0.00 |
| भुवनेश्वर | 939.00 रुपये | 0.00 |
| तिरुअनंतपुरम | 922.00 रुपये | 0.00 |
देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर (16 मार्च)
| शहर | पेट्रोल कीमत (रुपये/लीटर) | डीजल कीमत (रुपये/लीटर) |
|---|---|---|
| मुंबई | 103.50 रुपये | 90.03 रुपये |
| दिल्ली | 94.77 रुपये | 87.67 रुपये |
| चेन्नई | 100.90 रुपये | 92.48 रुपये |
| कलकत्ता | 105.41 रुपये | 92.02 रुपये |
| बेंगलुरु | 102.96 रुपये | 90.99 रुपये |
| हैदराबाद | 107.50 रुपये | 95.70 रुपये |
| पुणे | 104.04 रुपये | 90.57 रुपये |
| लखनऊ | 95.48 रुपये | 88.64 रुपये |
| जयपुर | 104.72 रुपये | 90.21 रुपये |
| अहमदाबाद | 94.49 रुपये | 90.21 रुपये |
| पाटणा | 105.47 रुपये | 91.49 रुपये |
पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर
पश्चिम आशियात युद्धाचे ढग घोंगावत असूनही देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर-रुपया विनिमय दराच्या आधारे किमती समायोजित करण्यासाठी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता किमतींचा आढावा घेतला जातो.