AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार ? न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांचा पुढाकार? किंमत किती ?

ब्रिटीशांच्या वसाहतवादी काळात लुटलेला कोहिनुर हिऱ्याला पुन्हा परत आणण्यासाठी भारत बऱ्याच काळापासून कायदेशीर आणि धोरणात्मक लढाई लढत आहे. आता ब्रिटनचे किंग चार्ल्स यांच्या अमेरिकन दौऱ्यात हा विषय कसा काय निघाला....

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार ? न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांचा पुढाकार? किंमत किती ?
Kohinoor Diamond
| Updated on: Apr 30, 2026 | 4:44 PM
Share

भारताचा अमूल्य किंमतीचा हिरा ‘कोहिनूर’ लंडनच्या राणीच्या मुकूटात विराजमान आहे. मात्र, हा हिरा पुन्हा भारताला परत कधी मिळणार याबाबत नेहमीच वादविवाद होत असतात. आता भारताची शान असलेल्या कोहिनूर हिऱ्याच्या घरवापसीचा रस्ता आणि लंडनच्या ऐवजी न्यूयॉर्कच्या मार्गाने होणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी ब्रिटीश किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडे तशी मागणी करण्याचे वचन दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. न्यूयॉर्कचे महापौर ममदानी या स्पष्टपणे म्हटले आहे की किंग चार्ल्स यांना कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

महापौर ममदानी यांची ‘डिप्लोमॅटिक गुगली’

भारतीय मूळ असलेले जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे ११२ वे महापौर आहेत. त्यांनी अलिकडेच ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचा अमेरिका दौरा असताना हा मुद्दा उचलला. ९/११ मेमोरिअल कार्यक्रमात किंग चार्ल्स यांच्या भेटी दरम्यान ममदानी यांनी औपचारिक एंजेट्याला बाजूला सारत भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या कोहिनूरचा विषय काढला. त्यांनी मीडियाला सांगितले की मला किंग यांच्या सोबत स्वतंत्र बोलण्याची संधी मिळाली. तर मी निश्चित रुपाने कोहिनूरला परत करण्याची मागणी करेन असे त्यांनी म्हटले आहे.

कोहिनूर हिऱ्यांची किंमत काय ?

व्यापारी दृष्टीने जर पाहिले तर कोहिनुरची किंमतीचा अंदाज काढणे हे मोठ्या आव्हानात्मक काम आहे. १०५.६ कॅरेटच्या या ‘माऊंटेन ऑफ लाइट’ ची कोणतीही अधिकृत किंमत निश्चित केलेली नाही. कारण हा हिरा कधी विकलाच गेलेला नाही. मात्र,मार्केट एक्सपर्ट्स आणि ग्लोबल ज्वेलर्सच्या अंदाज आश्चर्यचकीत करणारे आहेत.

या हिऱ्याची अंदाजित किंमत सुमारे १ अब्ज डॉलर ( सुमारे ८,३०० कोटी रुपये ) हून अधिक मानली जाते. जगातील अन्य महागडे हिरे उदा. ‘कलिनन’ ( ४०० दशलक्ष डॉलर) आणि ‘होम डायमंड’ ( ३५० दशलक्ष डॉलर ) च्या तुलनेत कोहिनुरची किंमत दुपट्टीहून जास्त आहे.

‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये याय हिऱ्या पाहण्यासाठी दरवर्षी लोक तिकीट खरेदी करतात. ज्यामुळे ब्रिटीश खजान्यात कोट्यवधी पाऊंडची कमाई होते.

न्यूयॉर्कचा मार्ग आणि कायदेशीर अडचणी

भले ममदानी यांनी या संदर्भात वक्तव्य केले आहे.मात्र, कोहिनुरला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग सोपा नाही. ब्रिटन आजही १९४८ च्या लाहोर कराराचा हवाला देतो. परंतू ममदानी सारख्या जागतिक नेत्याच्या समर्थनामुळे भारताच्या बाजूने एक नवीन ग्लोबल प्रेशर तयार होऊ शकते. मात्र, कोहिनुर एखाद्या बिजनस डिलिंग ऐवजी अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळे लंडनहून या हिऱ्याला भारतात आणणे कठीण काम आहे.

कोहिनूरचा प्रवास

जन्म: आंध्र प्रदेशातील गोलकुंडा खाणीत सापडला

प्रवास : मुगलांच्या मयूर सिंहासनातून नादिर शाह (फारस), नंतर अफगान अमीर आणि महाराजा रणजीत सिंह

कब्जा: 1849 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने शिखांकडून ताब्यात घेतला

सध्या: ब्रिटिश क्राऊनचा भाग, लंडनमध्ये सुरक्षित

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...