AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या कोंबड्या मेल्या रे….डीजेच्या आवाजाने पटापट मृत्यू; वरातीच्या धिंगाण्यात काय घडलं?

डीजेमुळे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 140 कोंबड्यांचा जीव गेला आहे. तसा आरोप पोल्ट्री फार्मच्या मालकाने केला असून थेट पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी आपला तपास सुरू केला आहे.

माझ्या कोंबड्या मेल्या रे....डीजेच्या आवाजाने पटापट मृत्यू; वरातीच्या धिंगाण्यात काय घडलं?
dj sound and poultry
| Updated on: Apr 30, 2026 | 4:58 PM
Share

 Poultry Farm : डीजेवर गाणं लागलं की आपलं अंग आपसुकच थिरकायला लागतं. आपणही लोकांसोबत कधी डान्स करायला लागतो, हे आपल्यालाच समजत नाही. डीजेवर डान्स करणं खूप आनंददायी वाटत असलं तरीही प्रत्यक्ष डीजेच्या मोठ्या आवाजामुळे कानांवर, शरीरावर गंभीर परिणाम होतात. माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत हे वाईट परिणाम दिसून येतात. सध्या असाच एक धक्कादाय प्रकार घडला आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे चक्क पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा जीव गेला आहे. या घटनेने संबंधित पोल्ट्री फार्म व्यवसायिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा प्रकार उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यातील आहे. येथे एका लग्न सोहळ्यातील वरातीत डीजे लावण्यात आला होता. ज्या ठिकाणी डीजे वाजत होता, त्याच भागात एका व्यक्तीचा पोलर्टी फार्म होता. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे पोल्ट्री फार्ममधील 140 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसा दावा पोल्ट्री फार्मच्या मालकाने केला असून थेट पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

म्हणून 140 कोंबड्यांचा जीव गेला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बल्दिराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरियापूर गावात साबीर यांचा एक पोल्ट्री फार्म आहे. याच भागात 25 एप्रिल रोजी बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. त्यासाठी वरातीमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. याच डीजेच्या मोठ्या आवाजामुळे पोल्ट्रा फार्ममधील 140 कोंबड्यांचा जीव गेला. डीजेचा आवाज माझ्या कोंबड्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचा जीव गेला, असा आरोप साबीर यांनी केला आहे.

पोलीस नेमकं काय करणार?

वरातीदरम्यान डीजेचा आवाज कमी करावा, अशी विनंती मी केली होती. परंतु कोणीही लक्ष दिले नाही.उलट त्या लोकांनी माझ्याशी भांडण केले. वरातीत काही लोकांनी दारुदेखील पिली होती, असा आरोप तक्रारदार साबीर यांनी केला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी नेमका काय तपास करणार, तपासातून काय पुढे येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...