सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय?

कोरोना काळातील निर्बंध, बंद पडलेले व्यवसाय आणि बेरोजगारीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळत आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, कारण काय?
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:57 PM

मुंबई : कोरोना काळातील निर्बंध, बंद पडलेले व्यवसाय आणि बेरोजगारीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळत आहे. असं असताना पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे बंद झालेलं उत्पन्न, कोरोना उपचारासाठीचा लाखो रुपयांचा खर्च आणि त्यात ही इंधनवाढ अनेकांचं कंबरडं मोडत आहे. चालू आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचल्या आहेत. एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आलीय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर कात्री फिरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे (Petrol Diesel Fuel price may increase again common people are suffering).

गुरुवारी (17 जून) अमेरिकेच्या डॉलरचं मुल्य वाढलंय. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या दिसत असल्या तरी भविष्यात या किमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईल फ्यूचर्सच्या दरात 33 सेंटने किंवा 0.4 टक्क्यांनी घट झालीय. त्याचा दर सध्या 74.06 डॉलर प्रति बॅरलवर पोहचलाय. मागील व्यापारी सत्रात एप्रिल 2019 नंतर कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च स्तरावर पोहचल्या आहेत.बुधवारी (16 जून) कच्च्या तेलाच्या किमती 74 डॉलर प्रति बॅरल झाल्या होत्या.

अमेरिका इराण अण्वस्त्र कराराचा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर प्रभाव

एमकेने एका अहवालात म्हटलं, “एक अण्वस्त्र कराराची शक्यता सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर प्रभाव पाडते आहे. जर अमेरिका आणि इराणमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले तर कच्च्या तेलाचा मुबलक पुरवठा बाजारात होईल. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत घट व्हायला हवी. मात्र, पुरवठ्यात अडथळे आल्यानं भविष्यात या किमती वाढण्याचीही शक्यता आहे.”

भारतात इंधन मागणी वाढल्यास आणखी दरवाढ

आशिया खंडातील इंधन दराचा विचार केला तर सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारतात दैनंदिन व्यवहार पूर्णपणे सुरळीत झालेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल डिझेलची मागणी आधीच्या स्तरावर पोहचलेली नाही. मात्र, लवकरच परिस्थिती सामान्य होऊन मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

Petrol and diesel price: देशभरात इंधन दरवाढीची ‘साथ’; मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

व्हिडीओ पाहा :

Petrol Diesel Fuel price may increase again common people are suffering

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.