Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?

| Updated on: Jun 03, 2021 | 8:14 AM

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) वाढत आहेत. पण आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 3 June 2021)

Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?
Follow us on

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच कारणामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) वाढत आहेत. पण आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग दुसऱ्या दिवशी स्थिर आहेत. याआधी मे महिन्यात तब्बल 16 पेट्रोल-डिझेलची किंमत वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 3 June 2021)

देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचण्याचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलातील दरवाढ असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकारण्यात येणारा करदेखील याला जबाबदार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीमध्ये त्याच्या वाहतुकीच्या खर्चाचाही समावेश आहे.

पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

गुरुवारी किंमती स्थिर राहिल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर  94.49 रुपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत 85.38 रुपये इतकी आहे. आज यात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 100.72 रुपये आहे. तर डिझेलचा दर हा 92.69 रुपये प्रतिलीटर आहे.

याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 94.50 रुपये असून डिझेलचा दर 92.69 प्रतिलीटर इतका आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये आज पेट्रोलचा दर हा 95.99 इतका असून डिझेलचा दर हा 90.12 प्रतिलीटर इतका आहे.

शहर   पेट्रोल (रुपये/लीटर)  डीज़ल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली  94.49 85.38
मुंबई 100.72 92.69
कोलकाता 94.50 88.23
चेन्‍नई 95.99 90.12
नोएडा  91.91 85.85
बंगळूरु 97.64 90.51
हैदराबाद 98.20 93.08
पटना 96.64 90.66
जयपूर 101.o2 94.19
लखनऊ 91.83 85.77
गुरुग्राम 92.33 85.97
चंडीगड 90.89 85.04

पेट्रोल-डिझेल दरवाढीची कारण काय?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. या वाढत्या किंमतीसंदर्भात तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलची आधारभूत किंमत आता 33 रुपयांच्या आसपास आहे. पण केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करामुळे ती किंमत 100 रुपये इतकी होते.

केंद्र सरकार इंधनावर सुमारे 33 रुपये उत्पादन शुल्क आकारते. यानंतर, राज्य सरकार त्यावर त्यांच्यानुसार व्हॅट आणि इतर उपकर लावतात. त्यामुळे कर सवलत न देता पेट्रोलच्या किंमती कमी करणे शक्य नाही.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 3 June 2021)

संबंधित बातम्या : 

एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम

‘या’ सरकारी योजनेत 5000 गुंतवणुकीतून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत व्हा करोडपती, कसा घ्याल फायदा?

घर मालक की भाडेकरू, मोदी सरकारने मंजूर केलेल्या नव्या कायद्याचा फायदा नेमका कोणाला?