Petrol and Diesel Prices: राज्यात आज इंधन दर स्थिर? तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol and Diesel Prices Today 14 Nov 2026: आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेल चे दर जाहीर झाले असून आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील नेमके दर काय आहेत हे जाणून घ्या.

या आठवड्यात बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ९५ डॉलर्सच्या आसपास राहिली. दरम्यान, प्री-मार्केट व्यवहारांमध्ये भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सुमारे ९४ या पातळीवर व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या भक्कम किमती आणि रुपयाचे घसरलेले मूल्य यांचा एकत्रित परिणाम तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) नफ्यावर होतो, ज्यामुळे इंधनाचे दर कमी करण्याला वाव उरत नाही. इंधनाचे नवीन दर दररोज सकाळी ६:०० वाजता जाहीर केले जातात. आज १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक शहरातील दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर
अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, छत्रपती संभाजीनगर – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, धाराशिव – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17.
महाराष्ट्रातील डिझेलचे दर
अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, छत्रपती संभाजीनगर – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, धाराशिव – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83.
पेट्रोल आणि डिझेलचे अधिकृत दर कसे तपासावेत?
तुम्ही तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन प्रत्यक्ष किमती तपासू शकता. ‘इंडियन ऑइल’चे (Indian Oil) ग्राहक ‘RSP’ लिहून त्यानंतर डीलर कोड टाकून 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवू शकतात. ‘BPCL’चे ग्राहक ‘RSP’ लिहून त्यानंतर डीलर कोड टाकून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात, तर ‘HPCL’चे ग्राहक ‘HPPRICE’ लिहून त्यानंतर डीलर कोड टाकून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात. याव्यतिरिक्त, संबंधित तेल कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल ॲप्सवरही दर उपलब्ध असतात. पेट्रोल-डिझेलचे दर सहसा सकाळी ६:०० वाजता बदलले जातात, त्यामुळे ती वेळ दर तपासण्यासाठी सर्वात योग्य असते.