Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, सहाव्या दिवशी पाहा काय आहेत दर

| Updated on: Mar 05, 2021 | 6:49 AM

देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, सहाव्या दिवशी पाहा काय आहेत दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) आकाशाला भिडत आहेत. या किंमतींमध्ये सातत्याने वाढत होत आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज थेट सहाव्या दिवशी (गुरूवारीही) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 05 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

मुंबईत पेट्रोलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.57 रुपये आहे. इतकंच नाहीतर डिझेल प्रतिलिटर 88.60 रुपये दराने विकलं जात आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी कायम उच्चांक गाठलं. त्याचबरोबर मुंबईतील प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्या पलीकडे पोहोचलं आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 91.35 लिटर आहे. त्याचबरोबर डिझेल आज प्रति लिटर 84.35 रुपयांवर आहे. चेन्नईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोल 93.11 रुपये प्रति लिटरला विकलं जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel rate today 05 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

संबंधित बातम्या –

Life Insurance Coporation of India: आपल्याकडे LIC पॉलिसी असल्यास लवकर करा हे काम, अन्यथा कोट्यवधींचे नुकसान

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदी 1217 रुपयांनी स्वस्त; झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकते स्वस्त, SBI ने सांगितली ‘आयडिया’

(petrol diesel rate today 05 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)