Today petrol, diesel prices: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 29 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात इंधनाचे दर स्थिर आहेत.

Today petrol, diesel prices: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 29 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
Image Credit source: tv9
| Updated on: May 04, 2022 | 7:37 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 29 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. एकीकडे आंतराराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा (Petrol Price in Delhi Today) दर प्रति लिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Mumbai Today) प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 110.85 व 100.94 रुपये लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.12 रुपये असून, एका लिटर डिझेलसाठी 99.83 रुपये मोजावे लागत आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिलपर्यंत देशात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा देखील अधिक वाढले मात्र त्यानंतर 29 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

  1. पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 105.41 रुपये लिटर आहे.
  2. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.40 असून, डिझेल 103.73 रुपये लिटर आहे.
  3. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.20 आणि 103.10 रुपये प्रति लिटर आहे.
  4. औरंगाबादमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 121.13 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 103.79 रुपये मोजावे लागत आहेत.
  5. राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल हे परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106.10 रुपये आहे.