Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार? पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे म्हणणे काय..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील का ? पेट्रोलियम मंत्री काय म्हणाले..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार? पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे म्हणणे काय..
इंधनाचे दर घटतील?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 10:25 PM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-diesel price) मोठी घसरण होण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना ठराविक किंमतीत इंधन मिळाल्याने किंमती घसरु शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ही चर्चा सुरु असतानाच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी याविषयीची भूमिका स्पष्ट केली. चर्चेत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 2-4 रुपयांचा फरक पडू शकत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांनी अजूनही पेट्रोल-डिझेलच्या कंपन्यांना चार रुपये प्रति लिटर नुकसान होत असल्याचा दावा केला. त्यांना इंधन दर कमी होतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी याप्रश्नाला थेट उत्तर दिले नाही.

हे सुद्धा वाचा

त्यांनी सांगितले की, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना नुकसान होत आहे. त्यामुळे मंत्रालय त्यांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार आहे .

महागाई वाढू नये यासाठी सरकारने जी धोरणं राबविली, त्यात पेट्रोलियम कंपन्यांनी मोठी मदत केली. त्यांनी अनेक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात दर वाढ केलली नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती महाग होत्या. कच्चा तेलाच्या किंमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या होत्या. 2008 नंतर पहिल्यांदा किंमती सर्वांत जास्त पातळीवर होत्या.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती पुन्हा घसरून त्या 85 डॉलर प्रति बॅरलवर आल्या. सध्या या किंमती 95 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची चर्चा रंगली असताना, मात्र पुन्हा कंपन्यांच्या तोट्याचा मुद्या समोर करण्यात आला आहे.

दाव्यानुसार, डिझेलवर कंपन्यांना जवळपास 27 रुपये प्रति लिटर तर प्रत्यक्षात 3-4 रुपये प्रति लिटर तोटा असल्याचे सांगण्यात येत आहे. तीनही सरकारी तेल कंपन्यांना एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण 19,000 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.