Success Story : जोडप्याने कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या, साडीच्या बिझनेसमध्ये गुंतवले 3 लाख, 4 वर्षात बनले कोट्यधीश, त्यांचं बिझनेस सिक्रेट काय?
आजीच्या काळातील साड्यांच्या डिझाइन्समधून या जोडप्याला व्यवसायाची कल्पना सुचली. 3 लाखांची गुंतवणूक केली, कॉकॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या,4 वर्षात बनले कोट्यधीश, त्यांचं बिझनेस सिक्रेट काय?

काहींच्या घरात आजीच्या जुन्या साड्या कपाटात आठवणी म्हणून आर्शिवाद म्हणून जपून ठेवलेल्या असतात. त्या साड्या कोणी नेसतही नाही. पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी या कायम असतात. याच जुन्या साड्यांमधील आठवणी आणि पारंपरिक विणकामाला व्यवसायाची संधी बनवण्याचा विचार एका जोडप्याला सुचला. पूजा नादिग आणि शशांक शिवरापूरापू यांनी आपापल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या आणि अवघ्या 3 लाख रूपयांच्या बचतीतून साड्यांचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या नेरिगे स्टोरी या ब्रँडची मासिक उलाढाल 1 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. नेरिगे याता अर्थ साड्यांच्या निऱ्या असा होतो.
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय
पूजा नादिग या टीसीएसमध्ये सुमारे 5 वर्षे सॉफ्टवेअर टेस्टिंगचे काम करत होत्या. तर शशांक यांनी MBA चे शिक्षण घेतल्यानंतर विक्री आणि स्टार्टअप क्षेत्रात काम केले होते. दोघांचेही करिअर व्यवस्थित सुरू होते. मात्र पूजांना स्वत: ची साडीची कंपनी सुरू करायची होती. 2019 च्या अखेरीस त्यांनी सविस्तर कल्पना शशांक यांच्यासमोर मांडली.
2020 मधील लॉकडाऊनच्या काळात दोघांनीही आपल्या करिअरला नव्याने विचार करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये त्यांनी ‘नेरिगे स्टोरी’ या ब्रँडची औपचारिक सुरूवात केली.
अवघ्या 3 लाख रूपयांत व्यवसायाची सुरूवात
या जोडप्याच्या कुटुंबात व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे सुरूवातीला अनेक गोष्टी त्यांना शिकाव्या लागल्या. त्यांनी आपल्या बचतीतील 3 लाख रूपये व्यवसायासाठी गुंतवले. सुरूवातीच्या काळात पूजा स्वत: साड्यांचे मॉडेलिंग करत असतं. तर शशांक फोटोग्राफी आणि व्हिडिओ करण्याची जबाबदारी सांभाळायचे
व्यवसायासाठी एक्स्टा पैसे आणखी जमा करता यावेत यासाठी पूजांनी झुंबा प्रशिक्षक म्हणूनही काम केले. तर शशांक यांनी विणकर, कारागीर आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित लोकांकडून साड्यांबद्दल माहितीही घेतली.
60 हजारांहून अधिक ग्राहक,महि्न्याला 1 कोटींची उलाढाल
2021 मध्ये या व्यवसायाने सुमारे 30 लाख रूपयांचा वार्षिक फायदा मिळवला. त्यानंतर ब्रँडचा विस्तार होत गेला. 2025 पर्यंत कंपनीची मासिक महसूल क्षमता 1 कोटींपर्यंत गेली. आतापर्यंत या ब्रँडने 60,000 हून अधिक ग्राहकांना जोडले आहे. तसेच हा माल विदेशातही जातो.
आजीच्या काळातील साड्यांमधून मिळाली ओळख
या ब्रँडचे वैशिष्ट्य म्हणजे 1950 च्या दशकातील साध्या, आकर्षक आणि पारंपरिक शैलीतील साड्यांचे संग्रह, आधुनिक साड्यांच्या बाजारात जुन्या काळातील रंगंसंगती, कापड आणि डिझाईन पुन्हा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला.