…म्हणून 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या नोटा हळूहळू बाजारातून काढून घेण्यात येणार आहेत. म्हणून त्यांची छपाई बंद केल्याचे वृत्त ‘द प्रिंट’ने प्रसिद्ध केले. या वृत्तानुसार नोव्हेंबर 2016 साली जेव्हा नोटाबंदी करण्यात आली तेव्हा बाजारात चलनाचा तुटवडा भासू नये म्हणून दोन हजाराची नोट आणण्यात […]

...म्हणून 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या नोटा हळूहळू बाजारातून काढून घेण्यात येणार आहेत. म्हणून त्यांची छपाई बंद केल्याचे वृत्त ‘द प्रिंट’ने प्रसिद्ध केले. या वृत्तानुसार नोव्हेंबर 2016 साली जेव्हा नोटाबंदी करण्यात आली तेव्हा बाजारात चलनाचा तुटवडा भासू नये म्हणून दोन हजाराची नोट आणण्यात आली होती. पण बाजारात आल्यानंतर दोन वर्षातच या नोटेची छपाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने बंद केली आहे. या नोटेवरुन अनेकदा विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच अनेक अर्थतज्ञांनीही दोन हजाराच्या नोटेवरुन मोदी सरकारवर टीका केली होती. या नोटेमुळे भ्रष्टाचार कमी होणार नाही तर वाढणार, त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं जात होतं.

त्यानंतर आता या नोटेची छपाई बंद करण्यात आल्याची महिती आहे. कर चुकवेगिरी, पैशांची अफरातफर यासाठी दोन हजार रुपायांच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या नोटेची छपाई थांबवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला असल्याचे ‘द प्रिंट’च्या वृत्तात सांगण्यात आले.

दोन हजाराची नोट चलनात आणल्याने भ्रष्टाचारात वाढ होईल, असे अनेक तज्ञांनी सांगितले होते आणि तसेच झाले. 2018 साली आयकर विभागाने टाकलेल्या धाडींमध्ये अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. त्यामुळे 1000-500 च्या नोटा रद्द करुन दोन हजाराची नोट बाजारात आणल्याने भ्रष्टाचार कसा आटोक्यात येईल, असा सवाल उपस्थित झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी जाहीर करत चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणली. नोटाबंदीने चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ही नोट तातडीने चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीकाही केली होती.

मार्च 2018 ला देशात 18.03 लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी 6.73 लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा होत्या. ही रक्कम एकूण चलनाच्या 37 टक्के होती. तर 7.73 लाख कोटी रुपयांच्या 500 च्या नोटा होत्या. 2017-18 मध्ये दोन हजाराचे केवळ 7.8 कोटी नोट चलनात आणण्यात आल्या. 2018 साली या नोटांच्या सर्कुलेशनमध्ये कमतरता आली आहे. 2017 साली जिथे दोन हजाराच्या 50.2 टक्के नोटा चलनात होत्या, 2018 मध्ये त्यांची टक्केवारी केवळ 37.3 होती.