कर्ज काढून घर घ्यावं की रेंटवर राहावं? फायद्याचा व्यवहार कोणता? जाणून घ्या…

अनेकजण भावनिक होऊन घर खरेदी करतात. पण घर खरेदी करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आपण घराचा ईएमआय किती भरतो आहोत, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

कर्ज काढून घर घ्यावं की रेंटवर राहावं? फायद्याचा व्यवहार कोणता? जाणून घ्या...
home on rent or buy
| Updated on: Sep 06, 2025 | 3:23 PM

When to buy Home : प्रत्येकालाच आपलं स्वत:चं घर असावं असं वाटतं. त्यासाठी काही लोक आपल्या जवळची बचत घर घरेदीत टाकून देतात. विशेष म्हणजे सोने, दागिनेदेखील विकून अनेकजण घर खरेदी करतात. आयुष्यभर भाड्याने राहण्यापेक्षा एकदाचे घर घेऊन टाकुया, असा विचार करून काही लोक खर खेरेदी करण्याचा निर्णय घेतात. मात्र खर खरेदीचा हाच निर्णय कधीकधी चुकीचा ठरू शकतो. ही चुक होऊ नये म्हणून नेमके काय केले पाहिजे? काय खरबरदारी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या….

1 कोटींच्या घरासाठी किती व्याज द्यावे लागते?

सीए नितीन कौशिक यांनी घर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? तसेच भाड्याने राहणे हे खर खरेदीपेक्षा कसे चांगले असू शकते? याबाबत सविस्तर सांगितले आहे. हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी 1 कोटी रुपये किंमत असलेल्या घराचे उदाहरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या उदाहरणानुसार समजा तुम्ही 1 कोटी रुपयांचे खर खरेदी केले. त्यासाठी 80 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. या कर्जावर 9 टक्के व्याजदर असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 72000 रुपयांचा हफ्ता येतो. कर्जाची ही परतफेड एकूण 20 वर्षांसाठी असेल तर तुम्हाला 1 कोटींच्या या घरासाठी एकूण 1.73 कोटी रुपये मोजावे लागतील.

हा सगळा हिशोब केल्यानंतर 1 कोटी रुपयांच्या घरासाठी तुम्हाला 93 लाखांचे व्याज द्यावे लागेल. म्हणजेच एक कोटींचे घर तुम्हाला 1 कोटी 93 लाख रुपयांना पडेल. त्यामुळे लाखो रुपये व्याज म्हणून देण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे योग्य ठरू शकले असते का? याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

घर खरेदी करणे योग्य की अयोग्य?

अनेकजण घर खरेदी करताना भावनिक होऊन निर्णय घेतात. भाड्याने किती दिवस राहणार? हाच विचार करून अनेकजण घर घेऊन टाकतता. काही लोक आपली पूर्ण बचत नव्या घरासाठी लावतात. काही लोकांचा तर अर्धा पगार फक्त घराचा ईएमआय भरण्यात संपून जातो. त्यामुळे आयुष्यात आणीबाणीच्या काळात पैसेच शिल्लक राहात नाहीत. त्यामुळे घर खरेदी करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

घराचा ईएमआय किती असावा?

आपल्याकडे एका कोटीच्या घरात राहायचे असेल तर 25 ते 30 हजार रुपये भाडे असते. त्यामुळे आयुष्याची सगळी कमाई घरात घालवण्यापेक्षा भाड्याने राहणे कधीकधी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घर खरेदी करत असाल तर तुमचा ईएमआय हा पगाराच्या 25 ते 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसायला हवा, हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)