रेनबॅक्सी सिंह बंधूंच्या जामिनाच्या नावाखाली त्यांच्या पत्नींची 204 कोटींची फसवणूक

| Updated on: Aug 30, 2021 | 4:46 PM

किंबहुना रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिवेंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांनी यापूर्वीच अशी तक्रार दाखल केली होती, आता आणखी एक माजी प्रवर्तक मालविंदर सिंग यांची पत्नी जप्ना सिंह यांनीही पोलिसांकडे अशी तक्रार दाखल केलीय.

रेनबॅक्सी सिंह बंधूंच्या जामिनाच्या नावाखाली त्यांच्या पत्नींची 204 कोटींची फसवणूक
Ranbaxy Singh brothers
Follow us on

नवी दिल्लीः रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि शिवेंदर सिंग यांना जामीन मिळवून देण्याच्या आणि तुरुंगात सुरक्षिततेच्या नावाखाली एका दलालाने त्यांच्या पत्नींना सुमारे 204 कोटींचा गंडा घातलाय. ही तक्रार या दोन माजी प्रवर्तकांच्या पत्नींनी स्वतः केलीय.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दुसरा गुन्हा दाखल

या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता, आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दुसरा गुन्हा दाखल केलाय. किंबहुना रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिवेंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांनी यापूर्वीच अशी तक्रार दाखल केली होती, आता आणखी एक माजी प्रवर्तक मालविंदर सिंग यांची पत्नी जप्ना सिंह यांनीही पोलिसांकडे अशी तक्रार दाखल केलीय. सिंह ब्रदर्स ऑक्टोबर 2019 पासून तिहार जेलमध्ये आहेत. रेलिगेअर ​​फिन्वेस्ट आणि त्याची मूळ कंपनी रेलिगेअर एंटरप्राइजकडून 2397 कोटी रुपयांच्या गंडाच्या आरोपावरून या दोघांना अटक करण्यात आलीय.

त्या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला

यापूर्वीच्या प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरविरोधात फसवणूक, खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केलाय. आर्थिक गुन्हे शाखा बनावट आणि खंडणीचे आरोपी सुकेश चंद्रशेखर सिंह यांची सतत चौकशी करीत आहे.

200 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक

रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची जामिनाच्या नावावर सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूकही झालीय. यापूर्वी एफआयआरमध्ये रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीने जामिनाच्या नावावर 200 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या

Post Office मध्ये FD करा, तुम्हाला एका वर्षात बँकेपेक्षा अधिक लाभ, किती व्याज मिळणार?

तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसऱ्या कोणालाही प्रवास करता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ranbaxy Singh brothers defraud their wives of Rs 204 crore in the name of bail