Ambani Tata : चीनची दादागिरी मोडीत काढणार! रतन टाटा-मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन, तुमचाही होईल फायदा

| Updated on: Mar 02, 2023 | 7:06 PM

Ambani Tata : या क्षेत्रातील चीनची दादागिरी लवकरच मोडीत निघणार आहे. रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांच्या कंपन्या त्यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी बोली प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. इतर परदेशी कंपन्याही स्पर्धेत आहेत.

Ambani Tata : चीनची दादागिरी मोडीत काढणार! रतन टाटा-मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन, तुमचाही होईल फायदा
Follow us on

नवी दिल्ली : जगात सध्या अक्षय ऊर्जेचा (Renewable Energy) वापर वाढला आहे. यामध्ये सौर ऊर्जाची महत्वाची भूमिका आहे. जगात सौर ऊर्जा मॉड्यूल (Solar Energy) तयार करण्यात चीनचा दबदबा आहे. चीनमधून इतर देशांना संसाधनांची निर्यात करण्यात येते. सौर ऊर्जा तयार करणारे पॅनल आणि इतर महत्वाचे साहित्य चीनमधूनच आयात करण्यात येते. पण ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. मोदी सरकारने देशात सौर ऊर्जा साहित्याचं देशातच उत्पादन वाढविण्यावर आणि चीनकडील आयात कमी करण्यावर भर देत आहे. यासाठी कंपन्यांना 19,500 कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि रतन टाटा यांच्या टाटा पॉवरसहीत (Tata Power) इतर परदेशी कंपन्यांनी बोली प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. निविदा प्रक्रिया 28 फेब्रुवारी रोजी बंद झाली.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, रिलायन्स आणि टाटा या कंपन्याशिवाय अमेरिकेतील कंपनी First Solar Inc., जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड (JSW Energy Ltd.), अवाडा ग्रुप (Avaada Group) और रिन्यू एनर्जी ग्लोबल पीएलसी (ReNew Energy Global Plc) या कंपन्या पण स्पर्धेत आहेत. त्यांनी ही वित्तीय बोली लावली आहे. हिंडनबर्ग अहवालाच्या दणक्यानंतर अदानी समूहाने या प्रक्रियेतून माघार घेतली. अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादने तयार करणारा समूह आहे. ही बोली प्रक्रिया सरकारी कंपनी सोलर एनर्जी कॉरपोरेशन (Solar Energy Corp) ने आयोजीत केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सौर ऊर्जा प्रकल्पात भारताला अग्रेसर करण्यासाठी उपाययोजना आखत आहेत. त्यामुळे अक्षय ऊर्जा तयार होऊन इतर पर्यायांवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. त्यासाठी खर्च होणारी भारतीय गंगाजळी वाचेल. देशात नवीन रोजगार निर्मिती होईल. कोरोनानंतर चीनच्या उत्पादनावर परिणाम तर झालाच आहे. पण त्यांची पुरवठा साखळी ही खंडीत झाली आहे. त्याचा फायदा भारताला होईल. भारत हा त्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

हे सुद्धा वाचा

भारत सौर उर्जा उत्पादने तयार करण्याची क्षमता वाढवत आहे. ही क्षमता 90 गिगावॅटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामुळे भारत त्याची गरज पूर्ण करु शकेल. तसेच भारत जगातील सौरऊर्जा उत्पादने निर्यात करणाराही देश होईल. त्यासाठी केंद्र सरकार कंपन्यांना अर्थसहाय देणार आहे. याप्रकल्पाविषयी रिलायन्स, अवाडा ग्रूप आणि जेएसडब्ल्यू एनर्जीने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. इतर कंपन्यांनी पण या बोली प्रक्रियेवर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही. या कंपन्यांचे शेअर या प्रक्रियेनंतर तेजीत येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचा आणि त्यातून कमाईची संधी मिळेल.