Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Businessman Bunglow : अंबानी, टाटा आणि बिर्ला राहतात या पॉश भागात, बंगले असे की नजरच नाही हटणार

Businessman Bunglow : देशातील दिग्गज उद्योगपतीचे बंगले कसे असतील, ते ज्या परिसरात राहतात, तो कसा असेल याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. अनेक उद्योगपती पॉश आणि महागड्या बंगल्यात राहतात. हे सुखवस्तू बंगले आजच्या सर्व आधुनिक तंत्रज्ञान, सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहेत.

Businessman Bunglow : अंबानी, टाटा आणि बिर्ला राहतात या पॉश भागात, बंगले असे की नजरच नाही हटणार
एक बंगला बने न्यारा
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:36 PM

नवी दिल्ली : घर खरेदी (Home Buying) करताना आपण सर्वच जण जास्तीत जास्त सोयी-सुविधा असणाऱ्या परिसराची पाहणी करतो. शेजारी चांगले असावेत, यासाठी आपण चांगला परिसर शोधतो. शांत, सुसंस्कृत, निसर्गरम्य भागातील घरांना अधिक मागणी असते. आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त घर (All Facilities) घेण्याकडे अनेकांचा कल असतो. स्वप्नातील इमल्यासाठी सर्वच जण झटतात. देशातील दिग्गज उद्योगपतीचे बंगले (Businessman Bunglow ) कसे असतील, ते ज्या परिसरात राहतात, तो कसा असेल याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. अनेक उद्योगपती पॉश आणि महागड्या बंगल्यात राहतात. हे सुखवस्तू बंगले आजच्या सर्व आधुनिक तंत्रज्ञान, सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहेत.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यापासून ते रतन टाटा (Ratan Tata) आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra) वा इतर कोणतेही उद्योगपती महागड्या आणि पॉश भागात राहतात. या ठिकाणी त्यांना सर्वप्रकारच्या सोयी-सुविधा मिळतात. हा परिसर इतका महागडा असतो की या ठिकाणी बंगला खरेदी करण्याचे स्वप्नही सर्वसामान्य बघू शकत नाही. या परिसरात सर्वच सुखसुविधा हात जोडून उभ्या असतात. हे भाग अत्यंत सुरक्षित आणि खास असतात.

मुकेश अंबानी यांच्या स्वप्नातील महल अत्यंत महागडा आहे. त्याच्या चर्चा सातासमुद्रापार पोहचल्या आहेत. मुकेश अंबानी 27 मजली एंटीलिया (Antilia) या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घराची किंमत जवळपास 1 दशलक्ष डॉलर आहे. या बहुमजली इमारतीत सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा हात जोडून उभ्या आहेत. या इमारतीत 165 हून अधिक कार पार्किंगची सुविधा आहे. या इमारतीत 9 हाय-स्पीड लिफ्ट लावण्यात आलेली आहे. एंटीलियामध्ये जागतिक दर्जाच्या सर्वच सुविधा आहे. या इमारतीवर एक नाही तर तीन हेलीपॅड आहेत. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा मुंबईत राहतात. रतन टाटा जवळपास 150 कोटी रुपयांच्या घरात राहतात. हे घर मुंबईतील कुलाब्यात आहे. द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे घर तीन मजली आहे. या घरात एक शानदार स्वीमिंग पूल ही आहे. तसेच आधुनिक काळातील सर्व सोयी-सुविधा पण आहेत.

झिरोदा या ट्रेडिग प्लॅटफॉर्मचे संस्थापक निखील कामथ बेंगळुरु या शहरात राहतात. ते किंगफिशर टॉवरमध्ये राहतात. ही इमारत 34 मजील आहे. हा परिसर आलिशान आहे. मीडिया अहवालानुसार, या टॉवरमधील दोन मजले विजय माल्या यांच्या मालकिचे आहेत.

अब्जाधीश कुमार मंगलम बिर्ला यांनी उद्योगपती अरुण एम जटिया आणि शाम एम जटिया यांच्यासह मलबार भागात एक घर खरेदी केले होते. या घराची किंमत जवळपास 425 कोटी रुपये आहे. हा बंगला 2926 वर्ग मिटर परिसरात आहे. या बंगल्याचे बांधकाम जवळपास 28,000 वर्ग फुट आहे. हे घरही आलिशान आहे. या घराची सजावट जोरदार आणि भव्य आहे.

अब्जाधीश आनंद महिंद्रा यांचा बंगलाही मलबार हिल परिसरात आहे. गुलिस्तान असे त्यांच्या घराचे नाव आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, गुलिस्तान 13,000 वर्ग फुटावर आहे. ही इमारत तीन मजली आहे. ही इमारत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहे. जागतिक दर्जाच्या सर्वसुविधांचा भडीमार या ठिकाणी आहे. हा बंगला जितका आलिशान तेवढाच सुंदर आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.