AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI MPC Meeting: महागाईत खिसा कापल्या जाणार, कर्जावरील EMI वाढणार? महत्त्वाची अपडेट काय?

Repo Rate EMI on Loan Hike: RBI च्या पतधोरण समितीची बैठक 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बाजारात रेपो दरात 25 बेसिस पॉईंट वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जर रेपो दर 5.50 टक्के झाल्यास गृहकर्ज आणि कार आणि इतर कर्ज महाग होईल. ईएमआय वाढेल.

RBI MPC Meeting: महागाईत खिसा कापल्या जाणार, कर्जावरील EMI वाढणार? महत्त्वाची अपडेट काय?
कर्जावरील EMI वाढणार?
| Updated on: Oct 03, 2026 | 9:53 AM
Share

RBI Repo Rate EMI on Loan Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. सहा सदस्यांच्या MPC च्या बैठकीनंतर रेपो दर जाहीर करण्यात येईल. ऐन सणासुदीच्या काळात रेपो दर वाढल्याने कर्ज महाग होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या बैठकीत महागाई, आर्थिक धोरणं आणि व्याज दरांचा पडताळा करण्यात येईल. RBI 7 ऑकोटबर रोजी सकाळी 10 वाजता रेपो दर जाहीर करेल. हे दर 5.50 टक्के झाल्यास गृह, कार आणि इतर कर्ज महाग होईल. कर्जदारांचा ईएमआय वाढेल. त्यांच्या खिशावर ताण येईल.

सध्या 5.25 टक्के रेपो रेट

RBI ने ऑगस्ट 2026 मधील गेल्या MPC बैठकीत रेपो रेट 5.25% निश्चित केला होता. यापूर्वी 2025 मध्ये केंद्रीय बँकेने एकूण 125 बेसिस पॉईंटची कपात केली होती. आता महागाई आणि जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम व्याजदरावर होण्याची शक्यता आहे. बाजारात रेपो दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेपो दरावरच केंद्रीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना एका विशिष्ट कालावधीसाठी पैसे देतो. यामध्ये बदल झाल्यास बँकिंग व्यवस्थेवर परिणाम होतो. त्याचा गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजावर थेट परिणाम होतो.

25 बेसिस पॉईंटची वाढ होणार?

18 ते 28 सप्टेंबर या दरम्यान Reuters वृत्तसंस्थेने अर्थतज्ज्ञांच्या केलेल्या सर्व्हेत जवळपास 60% म्हणजे 61 पैकी 35 अर्थतज्ज्ञांनी ऑक्टोबरच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 25 बेसिस पॉईंटने वाढून 5.50% होण्याचा अंदाज वर्तवला आहे. असे झाले तर फेब्रुवारी 2023 नंतर ही पहिल्यांदा रेपो दर वाढ असेल. ऑगस्ट 2026 मध्ये किरकोळ महागाई वाढून 4.82% इतकी झाली. हा महागाईचा आकडा RBI ने निश्चित केलेल्या 4% अपेक्षित दरापेक्षा गेल्या सलग तिसऱ्या महिन्यात अधिक आहे. इंधन, ऊर्जा आणि अन्नपदार्थांचा किंमतीत वाढ झाल्याने महागाई वाढली आहे.

7 ऑक्टोबर रोजी रेपो दर समोर

RBI च्या MPC ची बैठक 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान होईल. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीचा निर्णय जाहीर करतील. रेपो दरात वाढ केली. त्यात कपात केली की दर जैसे थे ठेवले हे समोर येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होईल.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल