RD Interest Rates: रिकरिंग डिपॉझिट खाते उघडायचेय, जाणून घ्या बँका आणि पोस्टाचा व्याजदर

| Updated on: Oct 06, 2021 | 7:28 AM

Interest Rates | व्याज दराबद्दल बोलायचे झाले तर देशातील मोठ्या बँका सध्या RD वर 4.90 टक्के ते 5.50 टक्के व्याज देत आहेत. हा व्याजदर एक वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्याच वेळी, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडले तर तुम्हाला जास्त व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा जास्त व्याज मिळू शकते.

RD Interest Rates: रिकरिंग डिपॉझिट खाते उघडायचेय, जाणून घ्या बँका आणि पोस्टाचा व्याजदर
रिकरिंग डिपॉझिट व्याजदर
Follow us on

नवी दिल्ली: मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. अशावेळी अनेकजण रिकरिंग डिपॉझिट( RD) खात्यात गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. सरकारी आणि खासगी बँकामध्ये बचत खात्यापेक्षा RD वर निश्चितच जास्त व्याज मिळते. लॉकडाऊनच्या काळात अनेक बँकांनी घरबसल्या RD खाते उघडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.

व्याज दराबद्दल बोलायचे झाले तर देशातील मोठ्या बँका सध्या RD वर 4.90 टक्के ते 5.50 टक्के व्याज देत आहेत. हा व्याजदर एक वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्याच वेळी, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडले तर तुम्हाला जास्त व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा जास्त व्याज मिळू शकते.

स्टेट बँक ऑफ इंडिया

1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी: 4.90 टक्के
2 वर्षांपासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी: 5.10 टक्के
3 वर्षांपासून 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी: 5.30 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: 5.40 टक्के

एचडीएफसी बँक

36 महिन्यांचा कालावधी: 5.15 टक्के
39 महिन्यांचा कालावधी: 5.30 टक्के
48 महिन्यांचा कालावधी: 5.30 टक्के
60 महिन्यांचा कालावधी: 5.30 टक्के
90 महिन्यांचा कालावधी: 5.50 टक्के
120 महिन्यांचा कालावधी: 5.50 टक्के

पंजाब नॅशनल बँक

1 वर्ष ते 2 वर्षे कालावधी: 5.25 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे कालावधी: 5.25 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे कालावधी: 5.30 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधी: 5.30 टक्के

ICICI बँक

30 महिन्यांचा कालावधी: 5.10 टक्के
33 महिन्यांचा कालावधी: 5.10 टक्के
36 महिन्यांचा कालावधी: 5.10 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे कालावधी: 5.35 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधी: 5.50 टक्के

पोस्ट ऑफिसात किती व्याज मिळणार?

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. परंतु तुम्ही अर्ज करून 5-5 वर्षे आणखी वाढवू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये दरमहा किमान 100 रुपये जमा करावे लागतात. ठेवी रु .10 च्या पटीत असाव्यात. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. सध्या पोस्ट ऑफिस RD वर 5.8 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे.

संबंधित बातम्या:

‘या’ बँकेच्या RD खात्यात महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करा, 6 वर्षांनी मिळवा 4.26 लाख

RD : ‘या’ चार खासगी बँका आरडी खात्यावर देतायत सर्वाधिक व्याजदर, वाचा सविस्तर

पोस्टाची भन्नाट योजना, 10 हजारांची गुंतवणूक करुन 16 लाखांपेक्षा जास्त नफा मिळवा