‘या’ बँकेच्या RD खात्यात महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करा, 6 वर्षांनी मिळवा 4.26 लाख

RD Account | ICICI बँकेने मोबाईल App च्या माध्यमातून RD खाते खोलण्याची सुविधा देऊ केली आहे. त्यासाठी तुम्हाला हे App स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल.

'या' बँकेच्या RD खात्यात महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करा, 6 वर्षांनी मिळवा 4.26 लाख
पीएफ खाते
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 8:27 AM

मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. अशावेळी अनेकजण रिकरिंग डिपॉझिट( RD) खात्यात गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. सरकारी आणि खासगी बँकामध्ये बचत खात्यापेक्षा RD वर निश्चितच जास्त व्याज मिळते. लॉकडाऊनच्या काळात अनेक बँकांनी घरबसल्या RD खाते उघडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. (Interest rates on recurring deposit account)

ICICI बँकेने मोबाईल App च्या माध्यमातून RD खाते खोलण्याची सुविधा देऊ केली आहे. त्यासाठी तुम्हाला हे App स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. हे अकाऊंट उघडल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून विशिष्ट रक्कम कापली जाईल आणि RD मध्ये जमा होईल.

कशी कराल गुंतवणूक?

ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांसाठी RD चा दर वेगवेगळा आहे. तुम्ही RD खात्यात महिन्याला 5000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. समजा तुम्ही सहा वर्षापर्यंत गुंतवणूक केली आणि तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळाले तर 2027 पर्यंत तुम्हाला साधारण 66,975 रुपये इतके व्याज मिळेल. याचा अर्थ महिन्याला फक्त 5 हजारांची गुंतवणूक करुन तुम्हाला सहा वर्षांनी 4,26,975 रुपये मिळतील.

RD वर व्याज कसे मिळते?

ICICI बँक RD च्या कालावधीनुसार व्याज देते. सहा महिन्यांच्या RD साठी सर्वाधिक कमी 3.50 इतका व्याजदर आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 4 टक्के व्याज दिले जाते. तीन ते पाच वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.36 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.85 टक्के इतके व्याज मिळते. पाच ते दहा वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.50 तर ज्येष्ठ नागरिकांना 6.30 टक्के इतके व्याज दिले जाते. मात्र, RD खात्यात वेळेवर प्रीमियम भरला नाहीतर मासिक व्याजाच्या रक्कमेवर हजार रुपयांपाठी 12 रुपये इतकी पेनल्टी आकारली जाते. ही रक्कम मॅच्युरिटीच्या रक्कमेतून कापली जाते.

संबंधित बातम्या: 

SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; LTC Claim संदर्भात मोठा निर्णय

(Interest rates on recurring deposit account)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.