SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

ICICI bank | ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या सहा महानगरांमध्ये बँकेचे पहिले तीन व्यवहार नि:शुल्क असतील.

SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
आयसीआयसीआय बँक

मुंबई: स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील. (ICICI bank revise charges for atm cash withdrawals cheque book and others know details)

ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या सहा महानगरांमध्ये बँकेचे पहिले तीन व्यवहार नि:शुल्क असतील. उर्वरित ठिकाणी ही मर्यादा पाच व्यवहारांची असेल. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी प्रत्येकी 20 रुपये आणि इतर व्यवहारांसाठी 8.50 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. ICICI बँकेच्या सिल्व्हर, गोल्ड, मॅग्नम, टायटेनियम आणि वेल्थ कार्डधारकांसाठी हे शुल्क लागू असेल.

तसेच होम ब्रांचच्या ATM मधून फक्त चारवेळा पैसे मोफत काढता येतील. त्यापुढील व्यवहारांसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच दुसऱ्या शाखेशी 25000 रुपयांपर्यंत नि:शुल्क आर्थिक व्यवहार होऊ शकतात. मात्र, त्यानंतर प्रत्येकी हजार रुपयांच्या व्यवहारावर पाच रुपये शुल्क आकारले जाईल.

चेकबुकचं काय होणार?

एका वर्षात 25 पानी चेकबुक नि:शुल्क मिळेल. त्यानंतर 10 पानी चेकबुकसाठी प्रत्येकी 20 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

सॅलरी अकाऊंटमध्ये काय बदल?

ICICI बँकेच्या बचत आणि सॅलरी अकाऊंटधारकांना प्रत्येक महिन्यात चार आर्थिक व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर प्रत्येकी 1000 रुपयांच्या व्यवहारासाठी 5 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

संबंधित बातम्या:

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम

(ICICI bank revise charges for atm cash withdrawals cheque book and others know details)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI