Rekha Jhunjhunwala : शेअर बाजारात पुन्हा डंका! रेखा झुनझुनवाला यांनी महिनाभरातच कमावले 650 कोटी, या 2 स्टॉकने दाखवली कमाल

| Updated on: Mar 07, 2023 | 9:47 PM

Rekha Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून जोरदार कमाई केली. महिनाभरातच त्यांनी या 2 स्टॉकमधून त्यांनी 650 कोटींची कमाई केली.

Rekha Jhunjhunwala : शेअर बाजारात पुन्हा डंका! रेखा झुनझुनवाला यांनी महिनाभरातच कमावले 650 कोटी, या 2 स्टॉकने दाखवली कमाल
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनावाला यांनी शेअर बाजारातून जोरदार कमाई केली. त्यांच्या एकूण संपत्तीत 650 कोटींची भर पडली. रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ होण्यामागे या दोन शेअरचा (2 Stocks) मोठा वाटा आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या दोन शेअरने जोरदार कमाई केली आहे. गेल्या महिनाभरात या दोन शेअरने जोरदार परतावा दिला आहे. हे दोन्ही ब्रँड्स अनपेक्षितपणे वधारले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यापारी सत्रात दलाल स्ट्रीट आणि जागतिक बाजारात ट्रेंड रिव्हर्सलनंतर लार्ज कॅप आणि मिडकॅप शेअर्सनी दणकेबाज कामगिरी केली आहे. अमेरिकन डॉलरच्या दरात तेजीने इक्विटी बाजारात (Equity Market) सध्या धुमाकूळ घातला आहे.

काही दिवसांपूर्वी रेखा झुनझुनवाला यांनी केवळ 2 आठवड्यात 1000 कोटी रुपयांची कमाई केली. या बातमीमुळे अनेक लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. बाजार अनेक दिवसांपासून हिंदोळ्यावर आहे. बाजारात तेजीमंदीचे सत्र सातत्याने सुरु आहे. 2 फेब्रुवारी रोजी टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 2310 रुपये होती. आता हा शेअर 2535 रुपयांवर पोहचला आहे. केवळ दोन आठवड्यातच या शेअरमध्ये 225 रुपयांची वाढ झाली.

रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीतूनही मोठी कमाई केली होती. पण सध्या ज्या दोन कंपन्यांच्या स्टॉकमधून त्यांनी कमाई केली. त्यात एक मेट्रो ब्रॅड्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स यांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे न कंपनीचे 10,07,53,935 शेअर वा 17.50 टक्क्यांची हिस्सेदारी आली. त्यातून त्यांच्या कमाईत मोठी भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत मेट्रो ब्रँड्सच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे 3,91,53,600 शेअर आहेत. त्यांचे पती राकेश झुनझुनवाला प्री-आयपीओ स्टेपनंतर या कंपनीतील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे हे संपूर्ण शेअर आले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोत हे सर्व स्टॉक आले आहेत.

गेल्या महिन्यात स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर किंमती 530.95 रुपयांनी वाढून 578.05 प्रति शेअर झाल्या आहेत. या कालावधीत या शेअरमध्ये 47.10 प्रति रुपयांची वाढ झाली आहे. रेखा झुनझुनावाला यांच्याकडे 10,07,53,935 स्टार हेल्थ इन्शुरन्सचे शेअर आहेत. या आरोग्य विमा कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत जवळपास 475 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

तर मेट्रो ब्रँड्सच्या शेअरमध्ये ही अशीच वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये 45.70 प्रति शेअर दरवाढ झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 3,91,53,600 मेट्रो ब्रँडसचे शेअर आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत जवळपास 179 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या एका महिन्यात स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँडसमधील वृद्धीमुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकूण 650 कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली.