Tata Share : या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, विक्रीच तर कोणी नावच घेईना, नुस्ता धूरच ना भौ

Tata Share : टाटा समूहाच्या या शेअरने बाजारात अगदी धुमाकूळ घातला आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहे. विक्री करण्यासाठी एकही गुंतवणूकदार समोर येत नाही. या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे.

Tata Share : या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, विक्रीच तर कोणी नावच घेईना, नुस्ता धूरच ना भौ
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 6:39 PM

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या या शेअरने बाजारात (Share Market) अगदी धुमाकूळ घातला आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहे. शेअर बाजारात सध्या टाटा समूहाच्या (Tata Group) या शेअरने गुतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या चार दिवसात या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले आहे. टाटा समूहाची कंपनी टीटीएमएल (Tata Teleservices Maharashtra Limited) सध्या बाजारात हिंदोळ्यावर आहे. टेलिकॉम सेक्टरमधील या स्टॉकमध्ये सातत्याने तेजीचे वार आहे. या शेअरने गेल्या पाच दिवसांपासून 25 टक्क्यांची उसळी घेतली आहे. यापूर्वी या शेअरमध्ये (TTML) सातत्याने घसरण दिसून येत होती. हा शेअर 290 रुपयांवर होता. त्यात घसरण झाल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी हा शेअर 52.10 अंकावर पोहचला. सध्या या शेअरमध्ये तेजीचे वारे आहे.

टीटीएमएलच्या (TTML) शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. तर ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी शेअर खरेदी केला, ते त्याची विक्री करण्यास तयार नाहीत. हा शेअर सातत्याने आगेकूच करत आहे. या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले आहे. सध्या हा शेअर 68 रुपयांच्या पातळीवर आहे. टाटा समूहाच्या या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. येत्या काही दिवसात हा शेअर सातत्याने उसळी घेत राहील. सध्या हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चस्तराकडे आगेकूच करत आहे. या शेअरने लाँग टर्म गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

टीटीएमएलच्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 2545 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत या शेअरने 1072 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अर्थात शेअर बाजारात अनेक उलाढाली होतात. अनेक बाबींचा, घडामोडींचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा. तुमचा ही अभ्यास असणे गरजेचा आहे. हा कोणताही गुंतवणूक सल्ला नाही. तुमी सदसदविवेकबुद्धीचा वापर करुन गुंतवणुकीचा सारासार विचार करु शकता.

हे सुद्धा वाचा

आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीचा शेअर यावर्षी जवळपास 11 टक्के घसरला आहे. गेल्या वर्षभरात सातत्याने घसरणीवर असला तरी या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार, या कंपनीचा शेअर भविष्यात अजून लांब उडी मारेल. हा लंबी रेस का घोडा ठरेल. या कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न दिला. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. 40,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर हे गुंतवणूकदार करोडपती झाले. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, आरती इंडस्ट्रीजचा शेअर सध्याच्या स्थितीपेक्षा लंबी उडी मारेल. या शेअरमध्ये 56 टक्के वृद्धी होईल. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 3 मार्च 2023 रोजी बीएसईवर जवळपास 0.82 टक्के वाढून 544 रुपयांवर बंद झाला.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.