
अनिल धीरजाल अंबानी समूहाची टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCOM) कंपनीला मोठा झटका बसला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँकेने (SBI) त्याचे कर्ज खाते फसवे (Fraud) म्हणून घोषित केले आहे. बँकेने कंपनीचे माजी संचालक अनिल धीरजलाल अंबानी यांचे नाव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे RBI,पाठवणार आहे. ही माहिती RCOM ला 30 जून 2025 रोजी SBI कडून पाठवलेल्या एका पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. हे पत्र 23 जून रोजी लिहिण्यात आले होते.
एसबीआयच्या पत्रात आहे काय?
1. हे पत्र 23 जून 2025 रोजी पाठवण्यात आले होते. कंपनीला ते 30 जून 2025 रोजी प्राप्त झाले.
२.SBI ने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्सचे कर्ज खाते हे फसवे Fraud म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
३.इतकेच नाही तर अनिल धीरजलाल अंबानी यांचे नाव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पाठवण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे हे प्रकरण?
SBI च्या कार्यवाहीवर कंपनीने म्हणणे मांडले आहे. त्यानुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स यावेळी कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेला (CIRP) सामोरे जात आहे. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC), 2016 अंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कंपनीचे संचालक मंडळ, रिझोल्यूशन्स प्रोफेशनल, अनिल निरंजन नानावटी यांच्याद्वारे ते नियंत्रित केले जाते. त्यांना NCLT, मुंबई खंडपीठाने नियुक्त केले आहे. एसबीआयने जी हरकत नोंदवली आहे ती, दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीची आहे. अनिल अंबानी आता या कंपनीशी जोडलेले नाहीत.
यापूर्वी कॅनेरा बँकेकडून कार्यवाही
एसबीआय बँकेद्वारे करण्यात आलेली ही पहिली कार्यवाही नाही. यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सला कॅनेरा बँकेने झटका दिला आहे. नोव्हेंब 2024 मध्ये कॅनेरा बँकेने कंपनीचे कर्ज खाते फसवे, फ्रॉड म्हणून घोषित केले होते. पण फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली होती. आरबीआय नियमानुसार, बँकेने कंपनीला म्हणणे मांडण्यास वेळ दिला नसल्याचा मत कोर्टाने मांडले होते.
Reliance Communications च्या गुंतवणूकदारांना झटका
Reliance Communications ची ट्रेडिंग विंडो सध्या बंद आहे. बंद होईपर्यंत या शेअरची किंमत 1.61 रुपये होती. एका वर्षात हा शेअर 13 टक्के घसरला आहे. वर्ष 2008 मध्ये शेअर 840 रुपयांवर होता. त्यानंतर या शेअरमध्ये भयानक घसरण दिसून आली.