Met Gala मध्ये ईशा अंबानी हिचा जलवा, 200 कोटींचा ब्लाऊज अन्… जगाला भोवळ
Met Gala Isha Ambani: देशातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी आणि उद्योजिका ईशा अंबानी सध्या Met Gala 2026 आहे. तिच्या लूक आणि स्टाईलने या सोहळ्यात चारचांद लागले आहेत. सर्वाधिक चर्चा झाली तिच्या 200 कोटींच्या ब्लाऊजची....

Met Gala 2026 मध्ये भारतीय ग्लॅमरचा तडका लागला. दिग्गज उद्योजिका ईशा अंबानी हिच्या खास स्टाईलने चारचांद लावले. तिची सोन्याची साडी आणि त्यावरील 200 कोटी रुपयांचे डायमंड ब्लाऊजमुळे फॅशनच्या दुनियेत खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात चर्चेत असणाऱ्या Met Gala 2026 मध्ये यंदा भारतीय परंपरा आणि आलिशानतेचा चेहरा जगाने पाहिला. ईशा अंबानी हिने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी तयार केलेली सोन्याची साडी घालून रेड कॉर्पेटवर एंट्री घेतली आणि जगाचे लक्ष वेधले. अनिता श्रॉफ अदजानिया यांनी तिची स्टाईल करून दिली. त्यात 200 कोटी रुपयांच्या त्या ब्लाऊजची एकच चर्चा रंगली.
200 कोटींच्या ब्लाऊजची एकच चर्चा
सर्वाधिक चर्चेत होते ते ईशा अंबानी हिचे ब्लॉऊज. कारण त्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. स्ट्रेपी डीप-नेक ब्लाऊज 1800+ कॅरेटच्या 200 हून अधिक ओल्ड कट डायमंड्सपासून तयार करण्यात आले आहे. हे ब्लॉऊज तयार करण्यासाठी जवळपास 2000 तास लागले आहे. हे ब्लाऊज उत्कृष्ट कलाकुसरीचे एक शानदार उदाहरण मानल्या जात आहे. या ब्लाऊजसह तिने अत्यंत महागडी सोन्याची दागिणं परिधान केल्यानंतर तिच्या सौंदर्याला चारचांद लागले. तिच्यावरून परीक्षकांच्या नजरा हटतच नव्हत्या.
ईशा अंबानीने स्वतःची तयारी केली ओळख
ईशा अंबानी ही एक महिला उद्योजिका आहे. त्या केवळ एक फॅशन स्टेटमेंट् नाहीत. तर ब्युटी विथ ब्रेन ही त्यांची ओळख आहे. रिलायन्स ब्रँड जागतिक स्तरावर नेण्यात तिचा मोठा हात आहे. ईशा अंबानी Reliance Retail Ventures Ltd ची संचालिका आहे. तर AJIO, Tira, Netmeds, Hamleys आणि Reliance Trends सारख्या ब्रँड्स मोठा विस्तार होत आहे.
ईशा अंबानीची एकूण संपत्ती किती?
माध्यमातील काही अहवालानुसार, ईशा अंबानी यांची अंदाजित एकूण संपत्ती जवळपास 800 कोटी ते 835 कोटी इतकी आहे. त्याचे मुख्य कारण रिलायन्स रिटेलचे नेतृत्व ईशाच्या हाती आहे. तर या व्यापाराला, कारभाराला रिलायन्स समूहाचा भक्कम पाठिंबा हे एक मोठे कारण आहे. ती कंपनीची कार्यकारी संचालक म्हणून काम करते. तिचा वार्षिक पगार जवळपास 4.2 कोटी इतका आहे.