देशात 10 रुपयानंतर आता 20 रुपयांच्या नाण्याचे लाँचिग होणार, पाहा वैशिष्ट्ये

| Updated on: Apr 20, 2020 | 7:41 PM

भारतात आतापर्यंत अनेक नाणी विनिमिय म्हणून वापरात येतात आणि कालांतराने चलनातून बाद (new twenty rupees coins) होतात.

देशात 10 रुपयानंतर आता 20 रुपयांच्या नाण्याचे लाँचिग होणार, पाहा वैशिष्ट्ये
Follow us on

मुंबई : भारतात आतापर्यंत अनेक नाणी विनिमिय म्हणून वापरात येतात आणि कालांतराने चलनातून बाद (new twenty rupees coins) होतात. आतापर्यंत चलन व्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. भाजप सरकारनेही नोटा बदलून अनेक नवीन चलन बाजारात आणल्या आहेत. आता लवकरच बाजारात 20 रुपयांचे नवीन नाणे येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत (new twenty rupees coins) वेबसाईटवरुन दिली आहे.

रिझर्व्ह बँकेकडे 10 लाख रुपयांची नाणी आहेत. लवकरच ही नाणी बाजारात येणार आहेत. मुंबईशिवाय कोलकाता, नोएडा आणि हैद्राबाद येथील मिंट (टांकसाळ) मध्येही 20 रुपयांची नाणी तयार केली जात आहे.

मुंबईशिवाय कोलकाता, नोएडा आणि हैद्राबाद येथील मिंट (टांकसाळ) मध्येही 20 रुपयांच्या नाण्यांची निर्मिती तयार केली जात आहे.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 8 मार्च 2019 रोजी नाण्यांची सीरिज जारी केली होती. या सीरिजमध्ये 20 रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. ही नाणी विशेष म्हणजे दृष्टीहीन लोकांसाठी तयार केली आहेत. ते ही नाणी सहज ओळखू शकतात.

11 वर्षानंतर नवीन नाण्याची निर्मिती

11 वर्षानंतर हे नवीन नाणं भारतीय चलनात येणार आहे. या नाण्यामध्ये 12 कोने आहेत. यापूर्वी मार्च 2009 मध्ये 10 रुपयांचे नाणे भारतीय चलनात आणले होते. आता लवकरच रिझर्व्ह बँक 20 रुपयांचे नवे नाणे चलनात आणू शकतो.

नवीन नाण्याचे वैशिष्ट्य

  • हे नवीन नाणे 20 एमएम व्यासचे असेल
  • नाण्यामध्ये 12 कोने असतील
  • 20 च्या नाण्यामध्ये 10 रुपयांच्या नाण्याप्रमाणे 2 रिंग असणार
  • वरच्या रिंगवर 65 टक्के तांबा, 15 टक्के जिंक आणि 20 टक्के निकेल असेल
  • आतल्या रिंगवर 75 टक्के कॉपर, 20 टक्के जिंक आणि 5 टक्के निकेल असेल