Inflation : खूशखबर! महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, किरकोळ महागाई होईल कमी

| Updated on: Dec 10, 2022 | 6:20 PM

Inflation : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे..

Inflation : खूशखबर! महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, किरकोळ महागाई होईल कमी
किरकोळ महागाई येईल आटोक्यात?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : देशातील महागाईच्या (Inflation) आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यान्नाच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यातही भाजीपाला-अन्नधान्य आणि खाद्यान्नाच्या किंमती घसरल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा किरकोळ महागाई दर (Retail Inflation Price) कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह केंद्र सरकारवरील दबाव कमी होणार आहे.

अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात महागाईचा दर 6.40 टक्क्यांवर येऊ शकतो. जर असे घडले तर हा गेल्या 9 महिन्यातील हा सर्वात नीच्चांकी दर असेल. यंदा फेब्रुवारी महिन्यात हा दर 7.9 टक्क्यांवर होता. त्यानंतर हा दर सप्टेंबर महिन्यात 7.41% वर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील महागाई दर वाढलेला होता. पण ऑक्टोबर महिन्यात महागाईच्या आघाडीवर मोठा उलटफेर झाला. महागाई दर घसरला.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबर महिन्यात 7.41% वर असलेला महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर पोहचला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती घसरल्याचा हा परिणाम होता.

अर्थतज्ज्ञांच्या मते, प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण येत असल्यामुळे महागाई कमी होईल. तरीही किरकोळ महागाई दर 6.40 टक्के असल्याने तो आरबीआयच्या दृष्टीने समाधानकारक नाही. आरबीआय महागाई दर 6 टक्क्यांच्या आत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार पुढील आठवड्यात किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करु शकते.

रशिया-युक्रेन दरम्यान युद्धाचा भडका उडाल्यानंतर जगभरात महागाई विक्रमी पातळीवर पोहचली. भारतात किरकोळ महागाई दरात खाद्यान्न किंमतींचा वाटा 40 टक्के आहे. याविषयी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महागाई दर दुसऱ्यांदा घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ING च्या आशिया विभागाचे प्रमुख रॉबर्ट कार्नेल यांच्या मते, येत्या काही महिन्यात महागाईतील घसरणी आपण अनुभव शकतो. खाद्यान्न आणि भाजीपाल्याच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. J. P. Morgan च्या अर्थतज्ज्ञांच्या मते येत्या मार्च 2023 पर्यंत महागाईचा दर
6.5 टक्के होऊ शकतो.