केवळ 20-25 हजार पगार आहे ? SIP वा FD नव्हे यात करा गुंतवणूक, पाच वर्षांत व्हा मालामाल

अनेकांना नोकरीच्या सुरुवातीला 20-25 हजार पगार असतो. त्यांच्यासाठी एसआयपी किंवा एफडी सुरु करणे एवढे फायद्याचे नसते. त्यामुळे त्यांनी इतर गोष्टींवर पैसा गुंतवला पाहीजे, त्या गोष्टी कोणत्या ते पाहा...

केवळ 20-25 हजार पगार आहे ? SIP वा FD नव्हे यात करा गुंतवणूक, पाच वर्षांत व्हा मालामाल
Invest
Updated on: Dec 02, 2025 | 4:33 PM

अनेक लोक म्हणतात की नोकरी लागताच SIP वा FD सुरु करणे सर्वात योग्य आर्थिक निर्णय असतो. परंतू सत्य हे आहे की रणनिती प्रत्येकाला लागू होत नाही. खास करुन तरुणांना ज्यांना करीयरच्या सुरुवातीला कमी पगार असतो. आणि त्यांचा पगार २० ते २५ हजाराच्या दरम्यान असतो.कमी उत्पन्न असेल तर बचत कमी होते आणि कंपाऊंडिंगचा परिणाम खूपच हळूवार होतो. अशाच एक रस्ता तुमचे आयुष्य बदलू शकतो. आणि सुरुवातीची ५ वर्षे तुम्ही या गोष्टींवर खर्च करत असाल तर भविष्यात जास्त कमाई करु शकता.

सुरुवातीचे 5 वर्षे काय करावे ?

या सुरुवातीच्या ५ वर्षांना तुम्ही तुमचे ‘स्किल बिल्डिंग आणि ग्रोथ फेज’ बनवा. या दरम्यान बचत योजनाच्या जागी दुसऱ्या गोष्टीत पैसे गुंतवणे फायद्याचे असते. उदा. नवीन स्कील शिकणे, प्रोफेशनल कोर्स करणे, कम्युनिकेशन आणि प्रेझेटेन्शन स्कील सुधारा. डिजिटल टुल्स, AI आणि डेटा एनालिसिस खिखा, इंडस्ट्रीतील लोकांचे नेटवर्क बनवा आणि प्रवास करुन जगाला समजा. ही गोष्टी तुमची मार्केट व्हॅल्यू वाढतात. स्कील्स वाढल्याने चांगली सॅलरी जॅम्प लवकर मिळते.

कमी सॅलरीत लवकर गुंतवणूक बेअसर का होते ?

जेव्हा सुरुवातीच्या जॉबची सॅलरी कमी असते, तेव्हा बहुंताश पैसा भाडे, खाणे आणि महत्वाच्या खर्चात संपून जातो.असा दर महिन्याला मुश्कीलीने १००० ते ५००० रुपयांपर्यत बचत होते.ही रक्कम गुंतवणूकीसाठी चांगला पाया तर जरूर आहे. परंतू कोट्यवधीचा कॉर्पस बनवण्यासाठी खूप कमी आहे. कमी रकमेवर कंपाऊंडिंग खूपच कमी चालते. आणि अनेक वर्षानंतरही रक्कम छोटीच रहाते. त्यात फारशी वाढ होत नाही.

म्हणून गुंतवणूक लवकर करा हा सल्ला सर्वांसाठी काही खास असत नाही. खास करुन जेव्हा तोच पैसा स्वत:ची स्कील्स सुधारण्यासाठी लावला तर इन्कम अनेक पटींना वाढू शकते. आणि पुढे जाऊन गुंतवणूकीची व्याप्ती चांगली वाढू शकते.

5,000 रुपयांच्या बचतीतून 5 वर्षात काय मिळते ?

जर दर महिन्याला पाच हजार रुपये SIP मध्ये गुंतवले आणि 10 टक्के रिर्टन मानले तरी पाच वर्षात एकूण रक्कम 4.6 लाख बनते. म्हणजे पाच वर्षात एक लाखाच्या व्याजाचा लाभ. ही हळूहळू वाढणारी ग्रोथ आहे. जी जीवनाला बदलण्यासाठी पुरेशी नाही.