SBI आणि भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

| Updated on: Dec 16, 2020 | 9:06 AM

या क्रेडिट कार्डमुळे भारत पेट्रोलियमचे इंधन , मॅक ल्युब्रिकन्ट, भारत गॅस (LPG) यासारख्या सुविधांसाठी संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून खर्च केल्यास 25 रिवार्ड पॉईंटस मिळतात. | BPCL SBI Card Octane

SBI आणि भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा
क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी अनेक नियम आणि खास वैशिष्ट्ये आहे. पण ही माहिती नसल्यामुळे ग्राहकांना त्याचा अधिक फायदा घेता येत नाही. यासाठी जाणून घेऊयात काय आहे महत्त्वाची वैशिष्ट्ये
Follow us on

मुंबई: एसबीआय कार्ड (SBI Card) आणि भारत कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एक नवीन क्रेडिट कार्ड आणले आहे. या क्रेडिट कार्डमुळे पेट्रोल-डिझेलसाठी कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. इंधनांवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांची बचत करण्याच्या उद्दिष्टानेच हे कार्ड लाँच करण्यात आल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले. (BPCL SBI Card Octane)

या क्रेडिट कार्डचे नाव BPCL SBI Card Octane असे आहे. या क्रेडिट कार्डमुळे भारत पेट्रोलियमचे इंधन , मॅक ल्युब्रिकन्ट, भारत गॅस (LPG) यासारख्या सुविधांसाठी संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून खर्च केल्यास 25 रिवार्ड पॉईंटस मिळतात.

BPCL च्या पेट्रोल पंपावर सूट

BPCL च्या पेट्रोल पंपावर इंधन किंवा ल्युब्रिकन्टसाठी खर्च केल्यास 7.25 टक्के कॅशबॅक आणि भारत गॅसच्या सुविधेसाठी खर्च झाल्यास 6.25 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळेल. याशिवाय, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि अन्य किराणा दुकानांमध्येही हे क्रेडिट कार्ड वापरल्यास सूट मिळू शकते.

BPCL SBI Card Octane कार्ड घेतल्यास ग्राहकांना देशभरातील बीपीसीएलच्या 17 हजार पेट्रोल पंपांवर त्याचा लाभ घेता येईल. प्रत्येक इंधन खरेदीवेळी ग्राहकांची बचत होईल.

स्टेट बँक आणि पेटीएमची भागीदारी

यापूर्वी एसबीआय कार्डसने Paytm सोबत भागीदारी करून Paytm SBI card आणि Paytm SBI card Select अशी दोन क्रेडिट कार्डस लाँच केली होती. ही दोन्ही व्हिसा कार्ड होती. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खर्चावर अधिकाअधिक बचतीसाठी ही क्रेडिट कार्ड फायदेशीर असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले होते. यंदाच्या वर्षात एसबीआय कार्डसने IPOच्या माध्यमातून 10.355 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.

इतर बातम्या:

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं

(BPCL SBI Card Octane)