Bank FD : बँकेच्या एफडीपेक्षा मिळवा जास्त रिटर्न, ही स्कीम करेल मालामाल..

| Updated on: Dec 13, 2022 | 11:14 PM

Bank FD : मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर ही योजना चांगली आहे..

Bank FD : बँकेच्या एफडीपेक्षा मिळवा जास्त रिटर्न, ही स्कीम करेल मालामाल..
योग्य परतावा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : मुदत ठेव (Fixed Deposit Scheme) योजनेत तुम्हाला एका ठराविक, निश्चित रक्कमेपक्षा जास्त परतावा मिळू शकत नाही. तुम्हाला गुंतवणूकीवर अधिकचा परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. म्युच्युअल फंडात अनेक योजना आहेत. तुम्हाला त्यांचा अभ्यास करुन, आर्थिक सल्लागाराच्या मदतीने, रेटिंगच्या अनुषंगाने या योजनांमध्ये गुंतवणूक(Investment) करता येईल. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा अधिकचा परतावा (Return) मिळेल. त्यामुळे अधिक फायदा होईल.

या शनिवारी, 10 डिसेंबर रोजी एसबीआय म्युच्युअल फंडने एसबीआई लाँग ड्यूरेशन फंडाची (SBI Long Duration Fund) सुरुवात केली आहे. ही एक ओपन-एंडेड डेट स्कीम आहे. या योजनेत मुख्यता डेट आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. दीर्घकालावधी साठी ही सर्वात चांगली योजना मानण्यात येत आहे.

पण या योजनेत गुंतवणूक केली म्हणजे, तुम्हाला खात्रीलायक, अपेक्षित परतावा मिळेल, याची कोणताही हमी नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असल्याने डोळे झाकून रक्कम गुंतवणे योग्य ठरत नाही. त्यासाठी अभ्यास आणि बाजाराची फुटपट्टी वापरणे आवश्यक असते. गुतंवणूक तज्ज्ञाचा सल्ला महत्वाचा ठरतो.

हे सुद्धा वाचा

मुदत ठेव ही पारंपारिक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत कमी व्याजदर मिळत असले तरी एक निश्चित रक्कम तुम्हाला परताव्याच्या रुपात मिळते. त्यामुळे तुम्हाला रक्कम डुबण्याचा धोका नसतो. तसेच 5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आरबीआयची डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटी मिळते. त्यामुळे रक्कम डुबण्याचा धोका नसतो.

एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एसबीआय लाँग ड्युरेशन फंड मधून मुख्य रुपात दार्घ कालावधीसाठी सरकारी सुरक्षा योजना आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. या योजनेत कर सवलतीसाठी दावाही दाखल करता येणार आहे.

या योजनेत न्यू फंड ऑफर (NFO) 20 डिसेंबर 2022 पर्यंत खुली राहील. 21 डिसेंबर 2022 रोजी म्युच्युअल फंड युनिट्स वाटप होतील. या योजनेसाठी कमीत कमी 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत व्याजदर जोखीम आणि क्रेडिट जोखीम असेल.