AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund : 17 वर्षांत या म्युच्युअल फंडचा जबरदस्त परतावा, प्रति माह 10 हजारांचे झाले 70 लाख

Mutual Fund : Mutual Fund मधील गुंतवणुकीने जोरदार परतावा दिला..

Mutual Fund : 17 वर्षांत या म्युच्युअल फंडचा जबरदस्त परतावा, प्रति माह 10 हजारांचे झाले 70 लाख
जोरदार परतावाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 27, 2022 | 5:57 PM
Share

नवी दिल्ली : Kotak Tax Saver Mutual Fund हा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधीचा आहे. गुंतवणूकदारांना यातंर्गत कलम 80सी नुसार कर सवलत (Tax Benefit) मिळते. हा एक ओपन-एंडेड ईएलएसएस फंड आहे. या फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. 17 वर्षांत या म्युच्युअल फंडने जबरदस्त परतावा दिला आहे.

या फंडची सुरुवात 23 नोव्हेंबर, 2005 रोजी झाली होती. या फंडला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडमध्ये 10 हजार रुपयांची एसआयपी (Mutual Fund SIP) सुरु केली असती तर 13.27 टक्के सीएजीआरमधून त्याला 70 लाख रुपये मिळाले असते.

जर गुंतवणूकदाराने 10,000 रुपये मासिक एसआयपीच्या माध्यमातून एक वर्षे गुंतणूक केली असती तर, त्याला एकूण 1.20 लाख रुपयांहून 1.28 लाख रुपये मिळाले असते. या फंडने SIP च्या माध्यमातून 14.06 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

या फंडने गेल्या तीन वर्षांमध्ये 22.54 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. अशात तुम्ही 10 हजार रुपयांची मासिक एसआयपीच्या हिशोबाने 3.60 लाख रुपये गुंतविले असते. तुमची रक्कम तीन वर्षांत 4.99 लाख रुपये झाली असती.

या फंडने गेल्या पाच वर्षांत 17.74 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपर्यंत 10 हजार रुपयांच्या मासिक गुंतवणूक केली असती तर त्याने एकूण 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती. त्याला 9.33 लाखांचा परतावा मिळाला असता.

या फंडने गेल्या सात वर्षांत 15.89 टक्के वार्षिक SIP परतावा दिला आहे. सात वर्षांत दहा हजार रुपयांच्या आधारे 8.40 लाख रुपये जमा झाले असता आणि 14.79 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

17 वर्षे सलग दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपीद्वारे या फंडमध्ये गुंतविले असते तर 20.40 लाख रुपये जमा झाले असते. त्याबदल्यात गुंतवणूकदारांना आता 70.84 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.