ऑक्टोबरमध्ये सीएनजी गॅसच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ; पटापट तपासा ‘या’ शहरांमधील ताज्या किमती

13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किंमत लागू होईल. किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 प्रति किलो होईल. नोएडामध्ये ही किंमत 56.02 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढेल.

ऑक्टोबरमध्ये सीएनजी गॅसच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ; पटापट तपासा या शहरांमधील ताज्या किमती
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 11:46 PM

नवी दिल्लीः CNG price updates: पूर्वी नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पीएनजी, सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता होती. आज इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत 2.28 रुपये प्रति किलोने वाढ जाहीर केली. सीएनजी गॅसची वाढलेली किंमत 13 ऑक्टोबरपासून म्हणजेच बुधवारपासून लागू होणार आहे.

13 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजल्यापासून नवी दरवाढ लागू

13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किंमत लागू होईल. किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 प्रति किलो होईल. नोएडामध्ये ही किंमत 56.02 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढेल. गुरुग्राममध्ये ही किंमत 58.20 रुपये किलो, रेवाडी 58.90 रुपये किलो, कैथल 57.10 रुपये किलो, मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली 63.28 रुपये किलो, फतेहपूर आणि हमीरपूर 66.54 रुपये किलो आणि अजमेर, पाली, राजसमंद 65.02 रुपये प्रतिकिलो असेल.

नैसर्गिक वायू 62 टक्के अधिक महागला

खरं तर 30 सप्टेंबर रोजी सरकारने नैसर्गिक वायू किंवा घरगुती गॅसच्या किमतीत 62 टक्के प्रचंड वाढ जाहीर केली. नैसर्गिक वायूची किंमत आता ऑक्टोबर-मार्चच्या अर्ध्या (ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022) साठी $ 2.90 MMBTU (मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट्स) पर्यंत वाढली. एप्रिल-सप्टेंबर 2021 च्या अर्ध्यासाठी ही किंमत $ 1.79 प्रति MMBTU होती.

2 ऑक्टोबरला देखील सीएनजी, पीएनजीच्या किमतीत वाढ

नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सीएनजी 2.28 रुपयांनी महाग झाला आणि पाईपद्वारे घरांपर्यंत पोहोचणारा स्वयंपाक गॅस (पीएनजी) 2.10 रुपयांनी महाग झाला. 2012 नंतर सीएनजीच्या किमतीतील ही सर्वात मोठी दरवाढ होती. दिल्ली व्यतिरिक्त नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडामध्ये सीएनजी गॅसच्या किमतीत 2.55 रुपयांनी वाढ करण्यात आली. पीएनजीच्या किंमतीत 2.10 रुपये प्रति क्यूबिक मीटरने वाढ करण्यात आली.

संबंधित बातम्या

हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील बंदी हटवली, आता विमानसेवा पूर्ण क्षमतेने चालणार

मोफत घरी घेऊन जा Hero Electric Scooter, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Second rise in CNG prices in October; Check out the latest prices in these cities