मोफत घरी घेऊन जा Hero Electric Scooter, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

आगामी सणासुदीचा हंगाम नजरेसमोर ठेवून हिरो इलेक्ट्रिकने मंगळवारी '30 Days, 30 Bikes’ ही फेस्टिव्ह ऑफर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.

मोफत घरी घेऊन जा Hero Electric Scooter, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Hero Electric Offer

मुंबई : आगामी सणासुदीचा हंगाम नजरेसमोर ठेवून हिरो इलेक्ट्रिकने मंगळवारी ’30 Days, 30 Bikes’ ही फेस्टिव्ह ऑफर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. ही ऑफर भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेंजसाठी जाहीर केली आहे. नवीन फेस्टिव्ह सीजन ऑफरचा भाग म्हणून, कंपनीने सांगितले आहे की, लकी ग्राहकांना भारतातील त्यांच्या 700+ डीलरशिपमध्ये हिरो इलेक्ट्रिक स्कूटर विनामूल्य चालविण्याची संधी मिळेल. (bring home new Hero Electric scooter for freem check offer details)

कंपनी दररोज एक लकी ग्राहक घोषित करेल जो त्याच्या पसंतीची इलेक्ट्रिक दुचाकी घरी घेऊन जाऊ शकतो. कंपनीने पुढे जाहीर केले आहे की, हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणारे सर्व ग्राहक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपोआप पात्र होतील. नवीन ऑफर 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल. स्पर्धेतील विजेत्यांची निवड लकी ​​ड्रॉद्वारे केली जाईल, त्यानंतर त्यांना पूर्ण एक्स-शोरूम किंमत परत केली जाईल.

हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल म्हणाले, “ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्सला प्रोत्साहन देण्यासाठी हिरो इलेक्ट्रिकने देशभरातील ग्राहकांना, प्रामुख्याने इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत 30 भाग्यवान ग्राहकांना त्यांची आवडती इलेक्ट्रिक दुचाकी विनामूल्य चालवण्याची संधी देऊन कंपनी या स्पर्धेचा भाग होण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करत आहे.

हिरो इलेक्ट्रिक त्यांच्या दुचाकींची बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा देत आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर हिरो इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात किंवा भारतातील त्यांच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊ शकतात. ग्राहकांचा खरेदीचा अनुभव सुलभ करण्यासाठी कंपनी परवडणाऱ्या ईएमआयसह सुलभ फायनान्स पर्याय देखील देत आहे. कंपनी त्यांच्या सर्व उत्पादनांच्या होम डिलिव्हरीसह 5 वर्षांचा एक्सटेंडेड वॉरंटी कालावधी देखील ऑफर करत आहे.

(bring home new Hero Electric scooter for freem check offer details)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI