
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सेमीकॉन इंडिया मिशनचा ( SEMICON India Mission ) शुभारंभ केला. हे मिशन भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती घडवणार आहे. पंतप्रधानांच्या सेमीकॉन इंडिया मिशनने भारत महासत्ता बनेल. या अभियानांतर्गत अनेक परदेशी कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करतील.
सेमिकॉन इंडिया 2023 मिशन भारताच्या सेमीकंडक्टर ( Semi conductor ) क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी वाढवणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्याचबरोबर फॉक्सकॉन, मायक्रोन, एएमडी, मार्वल, वेदांता सेमीकॉन इंडिया मिशन अंतर्गत करोडोंची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे रोजगाराच्या हजारो संधीही खुल्या होतील.
मायक्रोनची $ 825 दशलक्ष गुंतवणूक
मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय मल्होत्रा म्हणाले की, कंपनी सेमीकॉन इंडिया मिशन अंतर्गत भारतात $825 दशलक्ष गुंतवणूक करणार आहे. लवकरच कंपनी गुजरातमध्ये आपला सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे. त्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, त्यांच्या प्लांटद्वारे 5000 थेट नोकऱ्या आणि 15000 इतर नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
फॉक्सकॉन भारतात चिप्स बनवणार
तैवानची कंपनी फॉक्सकॉन भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातही गुंतवणूक करेल आणि चिप्स बनवण्यासाठी भारतासोबत काम करेल.
AMD सुद्धा 4000 कोटींची गुंतवणूक करणार
अमेरिकन चिप निर्माता Advanced Micro Devices ने शुक्रवारी सांगितले की ते पुढील पाच वर्षात भारतात सुमारे $400 दशलक्ष गुंतवणूक करेल आणि बंगळुरूच्या टेक हबमध्ये आपले सर्वात मोठे डिझाइन केंद्र स्थापन करेल.
सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक वाढेल
सेमिकॉन इंडिया 2023 चे उद्दिष्ट नेटवर्किंग, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आणि आकर्षक व्यवसाय संधींद्वारे सेमीकंडक्टर उद्योगाला पुढे नेण्याचे आहे. गांधीनगरमध्ये आजपासून सुरू होणारी ही तीन दिवसीय परिषद ३० जुलै रोजी संपणार आहे. यादरम्यान, जगभरातील सेमीकंडक्टर चिप, डिस्प्ले फॅब, चिप डिझाइन आणि असेंबलिंग क्षेत्रातील तज्ज्ञ भारतातील या क्षेत्रातील उदयोन्मुख संधींबद्दल त्यांचे व्हिजन शेअर करतील.