Semiconductor Mutual Funds : आधुनिक जगाचा सेमीकंडक्टर आणि चीप हा पासवर्ड ठरणार आहे. लॅपटॉपपासून ते अत्याधुनिक कारपर्यंत अनेक इंडस्ट्रीत सेमीकंडक्टरची मोठी मागणी आहे. देशात सेमीकंडक्टर उत्पादनाला सुरुवात होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. हायटेक चीप बाजारात दाखल होत आहे. भारत आता केवळ चीप खरेदीदार नसेल तर प्रमुख निर्यातदार असेल. सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातंर्गत मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे AI, इलेक्ट्रिक वाहनं, 5जी आणि स्मार्ट डिव्हाईस सारख्या क्षेत्रात चीपची मागणी वाढणार आहे. गुंतवणूकदारांसाठी पण सेमीकंडक्टर एक नवीन सोनेरी दालन ठरणार आहे. या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्यांना कमाईची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.
भारताचे सेमीकंडक्टर इकोसिस्टिम
भारताचे सेमीकंडक्टर इकोसिस्टिम वेगाने पुढे जात आहे. IIT मद्रास आणि इस्त्रो मिळून अंतराळ मोहिमेसाठी रिस्क-व्ही कंट्रोलर चिप ‘IRIS’ तयार केली आहे. 2023 मध्ये भारताचा सेमीकंडक्टर बाजार 38 अब्ज डॉलरचा होता. तर वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत तो 45-50 अब्जावर तर वर्ष 2030 पर्यंत हा बाजार 100-110 अब्ज डॉलरचा असेल.
या म्युच्युअल फंडवर ठेवा लक्ष
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.