Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

| Updated on: Jul 20, 2021 | 11:47 AM

Goodluck India | जर एखाद्या गुंतवणुकदाराने महिनाभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 1.81 लाख इतकी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 2.57 लाख रुपये इतकी झाली आहे.

Share Market: या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स
pib fact check
Follow us on

Multibagger stocks 2021: यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

गेल्या सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.

High Return Stocks: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात 5 लाखाचे झाले 32.95 लाख

एका वर्षात शेअर्सची किंमत चारपट

Goodluck India च्या समभागाची किंमत गेल्या महिनाभरात 81 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या सहा महिन्यात 157 टक्क्यांनी हा शेअर वधारला आहे. याचा हिशोब करायचा झाल्यास वर्षभरात Goodluck India शेअर्सनी गुंतवणुकदारांना चारपट कमाई करून दिली आहे.
जर एखाद्या गुंतवणुकदाराने महिनाभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 1.81 लाख इतकी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 2.57 लाख रुपये इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

शेअर बाजारात आज दोन कंपन्यांची नोंद, पहिल्याच दिवशी कमावला 42 टक्के नफा

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न