Share Market Update: शेअर बाजाराच्या घोडदौडीला लगाम, सेन्सेक्स-निफ्टीत घसरण; अदानी पोर्टला झटका

Sensex and Nifty | मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व, हीरो मोटोकॉर्प, टायटन आणि हिंडाल्को या कंपन्यांच्या समभागांची किंमत आज वधारली. तर विप्रो, श्री सीमेंट, अडाणी पोर्ट, कोटक महिंद्रा आणि टीसीएस कंपनीच्या समभागांची किंमत घसरताना दिसली.

Share Market Update: शेअर बाजाराच्या घोडदौडीला लगाम, सेन्सेक्स-निफ्टीत घसरण; अदानी पोर्टला झटका
सेन्सेक्स आणि निफ्टी
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:20 PM

मुंबई: शेअर बाजाराच्या विक्रमी दिशेकडे सुरु असणाऱ्या घोडदौडीला बुधवारी ब्रेक लागला. बाजार उघडल्यानंतरच सेनेक्स (Sensex) आणि निफ्टीची घसरण सुरु झाली. दुपारी साडेबारापर्यंत सेन्सेक्स 96 अंकांनी घसरुन 52492 च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टी-फिफ्टीमध्येही 26 अंकाची घसरण होऊन हा निर्देशांक 15746 च्या स्तरावर पोहोचला. (Share Market Update Sensex and Nifty fall down)

मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व, हीरो मोटोकॉर्प, टायटन आणि हिंडाल्को या कंपन्यांच्या समभागांची किंमत आज वधारली. तर विप्रो, श्री सीमेंट, अडाणी पोर्ट, कोटक महिंद्रा आणि टीसीएस कंपनीच्या समभागांची किंमत घसरताना दिसली. अडाणी पोर्टचा समभाग 1.14 टक्क्यांनी घसरुन 734च्या पातळीवर पोहोचला आहे.

‘सेन्सेक्स’चा 53 हजारांच्या शिखराला स्पर्श

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने मंगळवारी 53 हजारांच्या शिखराला स्पर्श केला होता. मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 53012.52 वर पोहोचत नवी उंची गाठली होती. मात्र, नफेखोरीमुळे सेन्सेक्स 53 हजाराची पातळी फार काळ राखू शकला नाही.

मात्र, मंगळवारी अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग चांगलेच वधारले होते. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे अदानी समूहाच्या संपत्तीत तब्बल 5 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

सोन्याचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. अशातच बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर (Gold price) दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचला. आज सलग दिसऱ्या दिवशी MCX मध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला. तर ऑगस्ट वायद्यासाठीच्या चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

रुपयांमध्ये आकडेमोड करायची झाल्यास आज MCX वर सोन्याचा दर 65 रुपयांनी वाढून प्रतितोळा 47,076 रुपये इतका झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 1,780.06 डॉलर्स इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या:

Gold Price: सोन्याचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर

Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

मोठी बातमी: विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.